आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॉस्को, बीजिंग:अफगाण-तालिबानची दहशत वाढतेय; आता रशियापासून चीनपर्यंत संकटाचे ढग

मॉस्को, बीजिंगएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

अफगाणिस्तानात तालिबानच्या वर्चस्वाखाली भाग वाढत चालला आहे. त्यामुळे रशिया व चीन सतर्क झाले आहेत. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन म्हणाले, तालिबानने मध्य आशियातील देशांच्या सीमांचा आदर राखला पाहिजे. हे देश एकेकाळी सोव्हिएत संघाचा भाग होते हे लक्षात घ्यावे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन म्हणाले, अफगाणिस्तानमधून अमेरिकी सैनिक परतण्याची प्रक्रिया हा घाईने घेतलेला निर्णय आहे. अफगाणिस्तानने दहशतवादाचा अड्डा होऊ नये यासाठी अमेरिकेने रोखले पाहिजे. अमेरिकेने अफगाणला अडचणीत टाकले आहे. अमेरिका लोकशाही व मानवी हक्काचे संरक्षक नाही. अफगाणिस्तानातील अराजकता इतर देशांत पसरू शकते. त्यामुळे क्षेत्रीय शांततेला धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा शांघाय इंटरनॅशनल स्टडीज युनिव्हर्सिटीमधील मध्य-पूर्व संबंधाचे तज्ञ फॅन होंगडा यांनी दिला होता.

रशियाचा विश्वास जिंकण्याचा तालिबानचा प्रयत्न
तालिबान रशियाचा विश्वास जिंकण्याच्या प्रयत्नात आहे. तालिबानी अधिकारी शहाबुद्दीन दिलावर यांनी मॉस्को येथील पत्रकार परिषदेत भूमिका मांडली. आम्ही इस्लामिक स्टेटला अफगाणिस्तानात कारवाया करू देणार नाहीत. आमच्या भूभागाचा वापर शेजारी राष्ट्राच्या विरोधात करू दिला जाणार नाही. तालिबानी कारवाईनंतर अफगाणिस्तानातील अनेक लोक मध्य आशियातील इतर देशांत आश्रयाला जाण्याची शक्यता आहे. ताजिकिस्तान, उझ्बेकिस्तानमध्ये ते जाऊ शकतात. ती रशियाची शेजारी राष्ट्रे असल्याने रशियाला सुरक्षेचे संकट वाटते. त्याचा परिणाम रशियावरही होऊ शकतो. गेल्या काही दिवसांत सुमारे १ हजार अफगाणी सैनिकांनी हल्ल्यात प्राण वाचवून ताजिकिस्तानला पलायन केले होते.

भास्कर एक्स्पर्ट / भारताची भूमिका स्पष्ट नाही, पण चर्चा हवी : मेजर जनरल (निवृत्त) पीके चक्रवर्ती
- भारताने कोणत्या गोष्टीची चिंता करावी? भारताची भूमिका काय आहे?

भारताची भूमिका स्पष्ट नाही. परंतु भारताने तालिबानशी चर्चा करायला हवी. इतर देशांबाबत आपण चर्चा करू शकतो, असा विश्वास आपण जागवला पाहिजे. इतर देशांमध्ये हस्तक्षेपाचीअशी भीती बाळगली जाऊ नये.
- तालिबानशी भारताचे संबंध कसे राहिलेत?
आपले संबंध तालिबानच्या विरोधात लढणारे असे आहेत. २००१ मध्ये नॉर्दर्न आघाडीला पाठिंबा दिला होता. ही आघाडी तालिबानशी संघर्ष करत होती.
- इसिस-तालिबान संघर्षामुळे भारतासाठी काय आव्हान असेल?
अफगाण लढाईत कमकुवत नाही. परंतु हा देश हवाई क्षेत्र, अत्याधुनिक शस्त्रास्त्रात कमकुवत ठरतो. इसिस व तालिबान कधी संघर्ष करतात. कधी एकत्र येतात.
- आपल्या सीमा अफगाणिस्तानपासून दूर आहेत?
लाहौर विमानतळाहून उड्डाण करताच १५ मिनिटांत अफगाणच्या क्षेत्रात पोहोेचता येते. पाकिस्तानशिवाय इंधनासाठी मदतीची गरज अफगाण भागवतो.

तालिबानच्या वर्चस्वामुळे मध्य आशियावर परिणाम
तालिबानने इराणजवळील सीमेला ताब्यात घेतले आहे. हा भाग इस्लामकाला नावाने आेळखला जातो. हा मार्ग इराणमधील प्रवेशासाठी महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर तो समोठ्या व्यापारी मार्गांपैकी आहे. म्हणूनच अफगाणिस्तानातील स्थितीचा मध्य-आशियावर परिणाम होऊ शकतो.

भारताला २० हून जास्त दहशतवाद्यांच्या गटाचा धोका
भारतातील अफगाणिस्तानचे राजदूत फरीद मामुंडजे म्हणाले, तालिबानचे २० हून जास्त दहशतवादी गटांशी संबंध आहेत. या संघटना रशियापासून भारतापर्यंतच्या क्षेत्रात काम करतात. तालिबानचे वर्चस्व वाढल्यास भारताला मोठा धोका होऊ शकतो.

पाकिस्तानात ७० हजारांवर हत्या करणाऱ्याचा धोका
पाकिस्तानने ९० च्या दशकात तालिबानच्या हाती अफगाणची सत्ता यावी यासाठी मदत केली होती. आता तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान पुन्हा कारवाया करण्याची चिंता सतावू लागली आहे. ७० हजार लोकांच्या मृत्यूसाठी ही संघटना दोषी आहे. टीटीपी पाकिस्तानात चिनी प्रकल्पांना लक्ष्य करू शकते. त्याशिवाय अफगाणिस्तानातून ५ लाख स्थलांतरित येण्याचीही पाकला चिंता वाटते.

बातम्या आणखी आहेत...