आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अफगानिस्तान:आपल्या आई-वडिलांची हत्या करणाऱ्या तालिबानी दहशतवाद्यांचा 16 वर्षीय तरुणीने केला खात्मा

गझनी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अफगानिस्तानातील एका 16 वर्षीय मुलीने दोन तालिबानी दहशतवाद्यांना गोळ्या घालून ठार मारल्याची आणि अनेक दहशतवाद्यांना जखमी केल्याची घटना घडली आहे. एएफपी या वृत्तसंस्थेने घटनेची माहिती दिली. सध्या तरुणीला आणि तिच्या भावाला सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलीचे नाव उमर गुल असे आहे. ती आपल्या आई-वडील आणि लहान भावासोबत ग्रीवा या गावात राहते. गुलचे वडील सरकारचे समर्थक असल्यामुळे तालिबानी दहशतवाद्यांनी घरात घुसून वडिलांना घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, यावेळी वडिलांना वाचवण्यासाठी आई मध्य्ये पडल्यामुळे दहशतवाद्यांनी आई-वडिलांना घरातून ओढून बाहेर नेले आणि सर्व गावासमोर त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. यादरम्यान गुल आणि तिचा लहान भाऊ घरातच लपले होते.

आई-वडिलांना मारल्यानंतर गुलने तिच्या घरातील AK-47 रायफलने दहशतवाद्यांना गोळीबार केला. यात दोन दहशतवादी जागीच मारले गेले, तर अनेकजण गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर अनेक दहशतवाद्यांनी गुलच्या घरावर हल्ला चढवला, पण गावातील लोकांनी त्यांचा हल्ला परतून लावला. सध्या गुल आणि तिच्या भावाला एका सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेनंतर गुलचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि सर्वत्र तिच्या शौर्याचे कौतुक होत आहे.