आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Afghanistan: ATMs Are Empty, Inflation Is Stagnant, Patient Services Are At A Standstill! People Were Upset When Services Collapsed After The Taliban Took Over

अफगाणिस्तान:एटीएममध्ये खणखणाट, महागाईवाढल्याने हाल, रुग्णसेवा ठप्प! तालिबानी वर्चस्वानंतर सेवा-सुविधा कोलमडल्याने लोक वैतागले

काबूल2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • छायाचित्र पंजशीरमधील असून बंडखोर गट, अफगाणींचे प्रशिक्षण सुरू आहे.

तालिबानच्या वर्चस्वानंतर अफगाणिस्तानात बँकिंग व आरोग्य सेवा कोलमडली आहे. एटीएममध्ये पैसे शिल्लक राहिलेले नाहीत. बँकांच्या बाहेरही लांबच लांब रांगा आहेत. भाेजन, आैषधींपासून जीवनावश्यक वस्तूंचा दर दुप्पट-तिपटीवर गेला आहे. आरोग्य सेवा क्षेत्रात सर्वाधिक दयनिय स्थिती पाहायला मिळते. परिचारिका पुरेशा संख्येने कामावर परतलेल्या नाहीत. काबूलमधील एका रुग्णालयातील अधिकारी म्हणाले, सध्या तरी हिंसाचारात जखमी झालेल्या लोकांची संख्या कमी झाल्याचे पाहत आहोत. बहुतांश रुग्ण काबूल विमानतळाहून येत आहेत. परंतु तालिबानने वर्चस्व मिळवल्यानंतर लोक गोळीबारात जखमी होत असल्याचा पॅटर्न दिसून येत आहे. तालिबानने देशावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारी सैन्य दलाशी संघर्ष केला. तेव्हा लोक त्यांच्या हल्ल्यात जखमी होऊन रुग्णालयात दाखल होत होते. कारण तेव्हा बाॅम्ब, मॉर्टरने हल्ले होत होते. आता मात्र लोकांवर गोळीबार केला जात आहे. अशा गोळीबारात जखमी लोक उपचारासाठी रोज येत आहेत. त्यामागे अराजकता हेच कारण आहे. काही लोक पोलिसांची कमतरता, कायदा व्यवस्था नसल्याचा गैरफायदाही घेत आहेत. आमच्याकडे दररोज गोळीबारात जखमी काही लोक येत आहेत. हेलमंडमध्ये आपत्कालीन रुग्णालयातील एक अधिकारी म्हणाले, दररोज आमच्याकडे किमान ५० लाख जखमी अवस्थेत दाखल होत आहेत.

सीआयए प्रमुखाने म्होरक्याची घेतली भेट
अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएचे संचालक विल्यम बर्न्स यांनी काबूलमध्ये तालिबानचा म्होरक्या अब्दुल गनी बरादरची भेट घेतली. कतारमध्ये अमेरिकी सरकार व तालिबान यांच्यात झालेल्या गोपनीय करारावेळी बर्न्स यांची उपस्थिती होती. काबूलमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी अमेरिकेला आणखी वेळ हवा आहे. तालिबानने ३१ ऑगस्टनंतर मुदतवाढ देण्याची मागणी फेटाळली आहे.

तालिबानच्या वेशात पाक सैनिकांकडून झडती
तालिबानच्या वेशात ३०० पाकिस्तानी सैनिक काबूलमध्ये घरोघर जाऊन झडती घेत आहेत. आयएसआय शोधत असलेल्या व्यक्तींवर कारवाई करण्यासाठी हे मोहीम राबवली जात आहे. काबूलच्या प्रमुख मशिदीशी संपर्क केला जात आहे. मोठ्या प्रमाणात खबऱ्यांची देखील भरती केली जात आहे. अफगाणिस्तानच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या लोकांचा खात्मा केला जाणार असल्याची धास्ती लोकांना वाटू लागली आहे.

यूएन: तालिबान जाहीरपणे लोकांची हत्या करतोय
संयुक्त राष्ट्र मानवी हक्क संघटनेचे वरिष्ठ अधिकारी मिशेल बेशलेट म्हणाले, अफगाणिस्तानात मोठ्या प्रमाणात मानवी हक्क उल्लंघनाच्या घटनांची माहिती मिळू लागली आहे. अफगाणिस्तानात तालिबाने जाहीरपणे लोकांची हत्या करत आहे. महिलांचे दमन करत आहे. जीनिव्हा फोरमने तालिबानच्या कारवायांवर निगराणी ठेवणारी प्रणाली विकसित करण्याची सूचना त्यांनी केली आहे. हत्या वाढल्याने लोक दहशतीखाली आहेत.

काबूल विमानतळाबाहेर अजूनही हजारोंची गर्दी
तालिबानच्या दहशतीमुळे देश सोडण्यासाठी मोठ्या संख्येने लोक प्रयत्न करत आहेत. हजारो लोक कच्च्याबच्च्यांसह उपाशीपोटी विमानतळाबाहेर उभे आहेत. त्यांना अमेरिका, युरोपीय देशात जाण्याची इच्छा आहे. अशा लोकांची संख्या आता ३० हजारांवर पोहोचली आहे. त्यात पासपोर्ट नसलेलेही अनेक लोक आहेत. लोकांना परदेशात जाऊन शांततेत जीवन जगण्याची इच्छा आहे.

बातम्या आणखी आहेत...