आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Afghanistan | Blast In Shia Mosque | Marathi News| Blast On Friday | Killings In Afghanistan | Taliban | Terror | Latest News And Updates

मशीदीत बॉम्बस्फोट:अफगाणिस्तानात पुन्हा शुक्रवारीच शिया मशीदीला लक्ष्य करून बॉम्बस्फोट; 32 जणांचा मृत्यू, 50 पेक्षा अधिक लोक जखमी

काबूल3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अफगाणिस्तानच्या कंधार येथे शुक्रवारी पुन्हा शिया मशीदीला लक्ष्य करून बॉम्बस्फोट घडवण्यात आला. शुक्रवारच्या नमाजच्या वेळी गर्दी असताना झालेल्या या स्फोटात किमान 32 जणांचा मृत्यू झाला. तसेच 50 हून अधिक लोक जखमी आहेत.

शिया बहुल परिसरात शुक्रवारच्या नमाजच्या वेळी झालेला हा सलग दुसरा बॉम्बस्फोट आहे.

पाकिस्तानी मीडियाने या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जारी केला आहे.

गेल्या आठवड्यातील स्फोटात 100 जणांचा बळी
अफगाणिस्तानात गेल्या शुक्रवारी कुंडूज शहरात अशाच प्रकारचा बॉम्बस्फोट घडवण्यात आला होता. त्यातही शिया बहुल परिसरात शुक्रवारच्या वेळी लोक नमाज अदा करताना स्फोट घडला होता. यात 100 जणांचा जीव गेला होता. तसेच शेकडो जखमी झाले होते. बॉम्बस्फोट घडला त्यावेळी मशीदीत 300 पेक्षा अधिक लोक होते.

इस्लामिक स्टेटने घेतली हल्ल्याची जबाबदारी
गेल्या आठवड्यात झालेल्या बॉम्बस्फोटाची जबाबदारी जगातील सर्वात कुख्यात दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटने घेतली होती. शिया समुदाय आणि शिया संस्थान आपल्या निशाण्यावर असतील असेही या संघटनेने धमकावले होते. हा हल्ला इस्लामिक स्टेटनेच केल्याच्या वृत्तास इंटेलिजेन्स एजंसीने सुद्धा अधिकृत दुजोरा दिला होता. तालिबानने देशाची सत्ता काबीज केल्यानंतर हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता.

बातम्या आणखी आहेत...