आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूयॉर्क:अफगाण अल-कायदाचा दहशतीचा अड्डा होऊ शकतो, अमेरिकेचे संरक्षणमंत्री ऑस्टिन यांचा इशारा

न्यूयॉर्क17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेवर २० वर्षांपूर्वी हल्ला करणाऱ्या अल-कायदा संघटनेने अफगाणिस्तानचा प्लॅटफॉर्म म्हणून वापर केला होता. अमेरिकन सैन्याची अफगाणिस्तानातून माघार, तालिबानने वर्चस्व मिळवल्यानंतर अल-कायदा तेथे पुन्हा अड्डा करण्याचा प्रयत्न करू शकते, असा इशारा अमेरिकन संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांनी दिला आहे. ते म्हणाले, अमेरिका कोणत्याही प्रकारच्या संकटाचा मुकाबला करताना अफगाणिस्तानात अल-कायदाला रोखण्यास तयार आहे. अल-कायदा अफगाणिस्तानात पुन्हा अड्डा करण्यात यशस्वी होतो की नाही, याकडे विश्लेषकांची नजर आहे. अल-कायदा, इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनांनी नेहमीच वाढ करणे, जागा बळकावण्याची प्रवृत्ती दाखवून दिली आहे. त्यांच्या तशा कारवाया दिसून आल्या आहेत. गृहमंत्री सिराजुद्दीन हक्कानीला दहशतवाद्यांच्या यादीत ठेवून अमेरिकेने दोहातील शांतता कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप तालिबानने केला आहे. हक्कानी नेटवर्कमध्ये सक्रिय राहिलेले सिराजुद्दीनवर २० वर्षांच्या युद्धादरम्यान अमेरिकेच्या सैन्यावर हल्ले करण्याचा आरोप होता. अमेरिकेने हक्कानीवर ५० कोटी डॉलरचे (सुमारे ३६०० कोटी रुपये) बक्षीस ठेवले आहे. त्याचा संयुक्त राष्ट्राच्या दहशतवाद्यांच्या यादीतही समावेश आहे. अफगाणिस्तानचा हीरो मानल्या गेलेले अहमद शाह मसूदच्या मकबऱ्याचीही तालिबानींनी तोडफोड केली.

महिलांवर दडपशाही, पत्रकारांना मारहाण
तालिबानच्या विरोधातील महिलां गुरूवारी काबूलमध्ये पाकिस्तानच्या राजदूत कार्यालयाच्या दिशेने आंदाेलक महिला जात होत्या. तेव्हा तालिबानींनी गोळीबार केला. ही घटना कव्हर करण्यासाठी आलेल्या काही पत्रकारांना तालिबानींनी ताब्यात घेतले. त्यांना मारहाणही केली. त्यात पत्रकार जखमी झाले.

बातम्या आणखी आहेत...