आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफगाणिस्तान भूकंपात 950 ठार:रिश्टर स्केलवर 6.1 तीव्रता, 600 जखमी; पाकिस्तानातही जाणवले भूकंपाचे धक्के

काबुल7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अफगाणिस्तानमध्ये आज सकाळी झालेल्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 6.1 रिश्टर स्केलच्या या भूकंपामुळे किमान 950 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 600 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) नुसार भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानमधील खोस्त शहरापासून 40 किमी अंतरावर होता.

दुसरीकडे, युरोपीयन भूमध्य भूकंप विज्ञान केंद्राने सांगितले की, या भूकंपाचा प्रभाव 500 किमीच्या परिघात होता. त्यामुळे अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारतामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.

आपत्कालीन संस्थांकडून मदतीचे आवाहन
सरकारचे प्रवक्ते बिलाल करीमी यांनी ट्विट केले - दुर्दैवाने, काल रात्री पक्तिका प्रांतातील चार जिल्ह्यांना तीव्र भूकंपाचा धक्का बसला. ज्यात आपले शेकडो देशवासी मारले गेले आणि जखमी झाले आणि घरे उद्ध्वस्त झाली. आम्ही सर्व आपत्कालीन एजन्सींना आवाहन करतो की पुढील विनाश टाळण्यासाठी या भागात टीम पाठवा.

लोकांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्याचे काम सुरू
अफगाणिस्तानच्या राज्य वृत्तसंस्थेचे रिपोर्टर अब्दुल वाहिद रायन यांनी ट्विट केले की पक्तिका प्रांतातील बर्मल, झिरुक, नाका आणि ग्यान जिल्ह्यात मृतांची संख्या 255 वर पोहोचली आहे, तर 155 लोक जखमी झाले आहेत. ढिगाऱ्याखालून लोकांना बाहेर काढण्यासाठी सुरक्षा दलांची हेलिकॉप्टर परिसरात पोहोचली आहे.

इस्लामाबाद आणि रावळपिंडीत भूकंपाचे धक्के जाणवले
दुसरीकडे, पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, इस्लामाबाद, पेशावर, रावळपिंडी आणि मुलतानमध्येही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. पाकिस्तानात शुक्रवारीही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले.

बातम्या आणखी आहेत...