आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Afghanistan ISIS India Connection; Kabul Airport Blast | 14 Kerala Residents Part Of Islamic State Of Khorasan; News And Live Updates

ISIS-K चे भारत कनेक्शन:केरळमधील 14 लोकांचा खोरासन दहशतवादी गटाशी संबंध, तालिबान्यांनी अफगाणिस्तानच्या तुरुंगातून केली होती मुक्तता

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जिहाद निर्यात करण्याचा कट; देशातील गुप्तचर यंत्रणा अलर्टवर

काबूल विमानतळावर आत्मघाती हल्ला करणाऱ्या इस्लामिक स्टेट खोरासन या दहशतवादी संघटनेचे भारतीय कनेक्शन समोर आले आहे. माध्यमांच्या माहितीनुसार, केरळमधील 14 लोकांचा या दहशतवादी संघटनेशी संबंध आहे. अशा परिस्थितीत भारताला भीती आहे की, हे दहशतवादी संघटन या लोकांना दहशतवादी कारवायांमध्ये सामील करून भारताचे नाव बदनाम करु शकते. विशेष म्हणजे गुप्तचर यंत्रनेतील काही अधिकाऱ्यांनी हे संघटन भारतातही पाय पसरवू शकते अशी भीती व्यक्त केली होती.

हिंदुस्तान टाइम्सच्या बातमीनुसार, तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तुरुंगात असलेल्या आपल्या लढाऊंची सुटका केली. दरम्यान, यामध्ये बगराम तुरुंगात असलेल्या केरळमधील 14 लोकांचीदेखील सुटका करण्यात आली. हे लोक खुरासन प्रांतातील इस्लामिक स्टेट ऑफ खोरासन या गटामध्ये सामील झाले होते.

2014 मध्ये इस्लामिक स्टेटमध्ये सामील
सूत्रांच्या माहितीनुसार, या 14 लोकांपैकी एकाने केरळमधील आपल्या घराशी संपर्क साधला. तर बाकीचे लोक काबूलमधील या गटासोबत असल्याचे सांगितले जात आहे. 2014 मध्ये जेव्हा इस्लामिक स्टेट ऑफ सिरिया आणि लेव्हेंटने मोसुलवर कब्जा केला. तेव्हा केरळच्या मल्लपुरम, कासारगोड आणि कन्नूर जिल्ह्यातून अनेक लोक पळून जात या गटामध्ये सामील झाले. यामधील बरेच जण अफगाणिस्तानातील नंगारहार येथे ISKP मध्ये सामील झाले.

26 ऑगस्ट रोजी खोरासन ग्रुपने काबुल विमानतळावर दोन आत्मघाती हल्ले केले.
26 ऑगस्ट रोजी खोरासन ग्रुपने काबुल विमानतळावर दोन आत्मघाती हल्ले केले.

तुर्कमेनिस्तान दूतावासाबाहेर दोन खोरासानी दहशतवादी पकडले
अहवालांनुसार, 26 ऑगस्ट रोजी तालिबानने तुर्कमेनिस्तानच्या दूतावासाबाहेर दोन खोरासानी दहशतवाद्यांना पकडले आहे. परंतु, या प्रकरणाबाबत तालिबानकडून कोणतही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आले नाही. गुप्तचर यंत्रनेनुसार, काबूल विमानतळावरील दहशतवादी हल्ल्यानंतर पकडलेल्या या पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून आयईडी जप्त करण्यात आले आहे.

कट्टरपंथी संघटना डोके वर काढू शकतात
एका अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की, जर या गटाने षडयंत्र रचले तर भारतातील काही कट्टरपंथी किंवा दहशतवादी संघटना पुन्हा डोके वर काढू शकतात. कारण हा दहशतवादी संघटन देशातील तरुणांना त्यांच्याशी जोडण्याचा प्रयत्न करू शकतो. अफगाणिस्तानात तालिबानच्या राजवटीनंतर अनेक दहशतवादी संघटनांना नवीन बळ मिळाले आहे. भारतातील अनेक हल्ल्यांची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदने सांभाळली आहे. त्यामुळे या संघटना पुन्हा एकदा देशात आपले डोके वर काढू शकतात.

जिहाद निर्यात करण्याचा कट; देशातील गुप्तचर यंत्रणा अलर्टवर
ISIS-K ला IS-K म्हणजे इस्लामिक स्टेट खोरासन असेही म्हणतात. ही संघटना तालिबान आणि अल-कायदापेक्षाही धर्मांध मानली जाते. हा गट भारत देशात जिहादी मानसिकता वाढवू शकतो अशी भीती भारतीय गुप्तचर अधिकाऱ्यांना आहे. हा संघटन मध्य आशिया आणि नंतर भारतात पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे.

तरुणांना त्यांच्या संघटनेशी जोडणे आणि नंतर दहशतवादी हल्ले करणे हा संघटनेचा हेतू आहे. कारण यापूर्वी केरळ आणि मुंबईतून अनेक तरुण इसीसमध्ये सामील झाले होते. त्यामुळे ही संघटना भारतात ही पसरु शकते अशी भीती अधिकाऱ्यांना होती. परंतु, ती आता वास्तवात येताना दिसत आहे. केरळमधील 14 लोक या संघटनेशी संबंधित असल्याने देशातील गुप्तचर यंत्रणा आणखी सतर्क झाल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...