आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Afghanistan Jalalabad Protest Update; Journalist Injured, Three People Killed In Taliban Terrorist Attacks

तालिबानला चॅलेंज:जलालाबादमध्ये लोकांनी राष्ट्रध्वजासह रॅली काढली, दहशतवाद्यांच्या गोळीबारात 3 लोकांचा मृत्यू; अनेक पत्रकारही जखमी

काबुल2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बुधवारी काबूलमध्ये हक्कानी नेटवर्कचे नेते आणि तालिबान कमांडर अनस हक्कानी यांनी अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करजई यांची भेट घेतली.

अफगाणिस्तानातील काही लोकांना तालिबानचे शासन मान्य नाही. याचे संकेत बुधवारी सापडले. जलालाबादमध्ये स्थानिक लोकांनी अफगाणिस्तानचा राष्ट्रध्वज फडकावला. यानंतर हा ध्वज हातात घेऊन रॅली काढण्यात आली. तालिबान लोक हे पाहून इतके वैतागले की त्यांनी निशस्त्र लोकांवर गोळीबार केला. 'रॉयटर्स' या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, तालिबानच्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. काही पत्रकार जखमीही झाले आहेत. यातील बहुतेक व्हिडिओ पत्रकार आहेत.

तालिबानला विरोध
जलालाबाद हे अफगाणिस्तानातील प्रमुख आणि मुख्य शहरांपैकी एक आहे. बुधवारी येथील मुख्य चौकात हजारो लोक जमले. त्यांनी अफगाणिस्तानचा राष्ट्रध्वज एका ठिकाणी फडकवला. यानंतर राष्ट्रध्वज घेऊन मुख्य रस्त्यावरून रॅली काढण्यात आली. तालिबान राजवटीला हे थेट आव्हान होते. इमारती आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या तालिबान्यांनी जमावाला पांगवण्यासाठी गोळीबार केला. यात तीन जण ठार तर काही जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

जलालाबाद तेच शहर आहे जे तालिबानने काबुलच्या पहिले काबिज केले होते. येथील लोकांनी तालिबानचा झेंडा उठवणे टाळले आहे. त्यांनी बुधवारी रॅलीद्वारे तालिबानला थेट आव्हान दिले.

अचानक गोळीबार
स्थानिक माध्यमांनी त्याचे काही व्हिडिओ फुटेजही जारी केले आहेत जे सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. यामध्ये लोक शांततेत रॅली काढत आहेत. दरम्यान, इमारती आणि रस्त्यावर तैनात तालिबानने गोळीबार सुरू केला. या दरम्यान तालिबानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. यावेळी तालिबान्यांनी पत्रकारांवर आणि विशेषत: व्हिडिओ पत्रकारांना मारहाण केल्याचे व्हिडीओमध्ये सांगण्यात आले आहे.

बोलणे आणि कृतीत फरक
'न्यूयॉर्क टाइम्स' मधील एका अहवालानुसार, तालिबानने महिलांचे संरक्षण आणि त्यांना योग्य हक्क देण्याचे आश्वासन नक्कीच दिले आहे, परंतु हे केवळ त्यांची प्रतिमा जगात चमकवण्याचा प्रयत्न असल्याचे दिसते. काबूल विमानतळाबाहेर रांगेतील महिलांना तालिबान्यांनी मारहाण केली. त्याची काही छायाचित्रेही समोर आली आहेत. एका महिलेला बंदुकीच्या बटने मारहाण करण्यात आली. ही महिला बुरख्यामध्ये होती आणि स्वतःचा बचाव करताना दिसली.

हमीद करजई सक्रिय
बुधवारी काबूलमध्ये हक्कानी नेटवर्कचे नेते आणि तालिबान कमांडर अनस हक्कानी यांनी अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करजई यांची भेट घेतली. या बैठकीला माजी परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला-अब्दुल्ला उपस्थित होते. तालिबानमध्ये अनेक गट आहेत. यापैकी हक्कानी नेटवर्क खूप महत्वाचे मानले जाते. अमेरिका या गटाला अफगाणिस्तानातील हिंसाचाराला मुख्य जबाबदार मानतो. त्याचे बहुतेक तळ पाकिस्तानच्या आदिवासी भागात आहेत. हा गट पाकिस्तानी लष्कर आणि ISI च्या इशाऱ्यावर काम करतो.

बातम्या आणखी आहेत...