आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तालिबानपूर्वी महागाईच घेणार जीव:काबूल विमानतळावर पाण्याची बाटली 3000 रुपयांना तर जेवणाची किंमत 7500, त्यातही डॉलर्समध्येच मोजावी लागतेय रक्कम

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अफगाणिस्तानातून बाहेर पडण्यासाठी काबूल विमानतळावर जमलेल्या लोकांसाठी परिस्थिती अत्यंत बिकट होत आहे. भीती तर आहेच आणि खाद्यपदार्थांच्या किमतीही मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. स्थिती अशी आहे की पाण्याच्या बॉटलसाठी 40 डॉलर्स म्हणजे सुमारे 3 हजार रुपये आणि जेवणासाठी100 डॉलर्स म्हणजे सुमारे साडे सात हजार रुपये मोजावे लागत आहे.

अहवालांनुसार, या महागाईमुळे तेथे जमलेल्या हजारो लोकांसाठी परिस्थिती अत्यंत कठीण बनत आहे. समस्या अशी आहे की खाण्या -पिण्याच्या किंमती अफगाणी चलनात लोकांकडून घेतल्या जात नाहीत. यासाठी त्यांना फक्त डॉलर्स द्यावे लागत आहे.

गुडघ्यापर्यंत पाणी आणि कचऱ्यामध्ये लोक उभे आहेत -

काबूल विमानतळाबाहेरील काही व्हिडिओ समोर येत आहेत. यामध्ये लोक गुडघ्यापर्यंत पाणी आणि कचऱ्यामध्ये उभे आहे असं दिसत आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्रीय फजलूर रहमान यांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेला सांगितले की लोक काँक्रीटची भींत आणि काटेरी तारांच्या मागे उभे आहेत आणि जर कोणी भिंतीवर चढण्याचा प्रयत्न केला तर सुरक्षा कर्मचारी त्याला मागे ढकलून देतात.

वस्तूंच्या किमती इतक्या वाढल्या आहेत की सामान्यांना ही किंमत देणे शक्य होत नाही. अब्दुल रज्जाक यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की लोक सतत येत आहेत. गर्दी प्रचंड वाढत आहे. अशा स्थितीत महिला आणि मुलांची स्थिती बिकट होत आहे.

अमेरिकन सैनिक अफगाण मुलाला पाणी देत ​​असल्याचा फोटो व्हायरल -

दरम्यान, एका अमेरिकन सैनिकाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो अफगाण मुलांना पाणी देताना दिसत आहे. मुले त्याला पाहून हसत आहेत. मात्र, हा फोटो कधी काढला गेला हे अद्याप कळू शकलेले नाही. अमेरिकेच्या संरक्षण विभागाने याला दुजोरा दिलेला नाही. पण लोक व्हिडिओ पाहिल्यानंतर म्हणत आहेत की संकटातही आशा जिवंत आहे.

प्रत्येकी तिघांमध्ये एक अफगाणी भूकेला- अहवाल
अफगाणिस्तानच्या संकटाच्या दरम्यान, वर्ल्ड फूल प्रोग्रामने एक रिपोर्ट जारी केला आहे. यानुसार, प्रत्येक तीन अफगाणांपैकी एक म्हणजे सुमारे 14 दशलक्ष लोक भुकेले आहेत. 20 लाख मुले कुपोषित आहेत आणि त्यांना त्वरित मदतीची गरज आहे. अहवालात म्हटले आहे की पिके नाहीत, पाऊस नाही, पिण्याचे पाणी नाही, लोक गरिबीत जगत आहेत.

बातम्या आणखी आहेत...