आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अफगानिस्तानात दहशतवादी हल्ला:काबुल यूनिव्हर्सिटीमध्ये अंदाधुंद गोळीबार; 20 विद्यार्थ्यांचा मृत्यू, तर 40 पेक्षा जास्त जखमी

काबुलएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुरक्षा दलाकडून तीन दहशतवाद्यांचा खात्मा

अफगानिस्तानची राजधानी काबुलमध्ये सोमवारी दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केला. काबुल विद्यापीठातील बुक फेअरमध्ये आलेल्या 3 दहशतवाद्यांनी विद्यार्थ्यांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. रिपोर्ट्सनुसार, या हल्ल्यात कमीत कमी 20 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून, 40 पेक्षा जास्त विद्यार्थी जखमी आहेत. अफगान गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, प्रत्युत्तरात सुरक्षा दलाकडून तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

स्थानिक मीडियाने सांगितल्यानुसार, विद्यापीठाच्या उत्तर दिशेकडून गेटवर विस्फोट झाल्यानंतर गोळीबार सुरू झाला. न्यूज चॅनलमध्ये दाखवण्यात येत असलेल्या फुटेजमध्ये अनेक विद्यार्थी आपला जीव वाचवण्यासाठी पळताना दिसत आहेत. अद्याप कोणत्याच दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली नाही. तालिबानने या हल्ल्याशी त्यांचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.