आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Afghanistan | Marathi News | 318 Media Outlets Closed After Taliban Capture, 72% Female Journalists Unemployed

इंटरनॅशनल मीडियाला आवाहन:अफगाणिस्तानमध्ये पत्रकारांचे हाल; तालिबानच्या कब्जानंतर 318 मीडिया संस्थानांना कुलूप, 72% महिला पत्रकार झाल्या बेरोजगार

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर संपुर्ण देश उद्धवस्त झाले आहे. पत्रकाराचे देखील अफगानिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात हाल सुरू आहेत. अफगाणिस्तानच्या 34 प्रांतांपैकी 33 प्रांतातील सुमारे 318 मीडिया संस्थान तालिबानने बंद केली आहेत. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ जर्नलिस्ट्सने दिलेल्या माहितीनुसार, 51 टिव्ही चॅनेल्स, 132 रेडिओ स्टेशन आणि 49 ऑनलाईन मीडियाला संस्थानांनी बंद करण्यात आले आहे. याचा सर्वाधिक परिणाम वृत्तपत्रांवर पडला आहे. येथे 114 पैकी केवळ 20 वृत्तपत्र प्रकाशित केले जात आहेत.

72% महिला पत्रकारांची नोकरी गेली

टोलो न्युजने दिलेल्या वृत्तानुसार, इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ जर्नलिस्ट्सने अफगाणिस्तानच्या मीडियासंबंधी चिंता व्यक्त केली आहे. सध्या 5063 पत्रकारांपैकी केवळ 2334 पत्रकार पत्रकारिता करत आहेत. म्हणजे 2729 पत्रकार बेरोजगार झाले आहेत. त्यात सुमारे 72% महिला पत्रकारांचा समावेश आहे. सध्या 243 महिला पत्रकार मीडियामध्ये काम करत आहेत. अफगाणिस्तानच्या प्रत्येक परिस्थितीवर पत्रकारिता करणारे पत्रकारांना मोठा आर्थिक सामना करावा लागण आहे.

अन्यथा मीडिया संस्थान बंद होण्याच्या मार्गावर

अफगाणिस्तान मीडिया संघटनांनी आंतराराष्ट्रीय मीडियाला सध्याच्या स्थितीत अफगाणच्या नागरिकांपर्यंत बातम्या पोहोचवण्याचे आणि अफगाणिस्तानच्या मीडियाला वाचवण्यास सांगितले आहे. अफगाणिस्तान इंडिपेंडंट जर्नालिस्ट असोसिएशनचे प्रमुख हफिजुल्लाह बरकझाई म्हणाले की, देशातील माध्यमांच्या स्थितीकडे तातडीने पावले उचलली गेली नाहीत, तर आगामी काळात अफगाणिस्तानमध्ये मोजक्याच माध्यम संस्था उरतील. असे बरकझाई म्हणाले. प्रसारमाध्यमांवर घातलेली बंधने कायम राहिल्यास माध्यम संस्थांचे कामकाज बंद पडून कोलमडून पडतील, असे काही पत्रकारांनी सांगितले. आम्ही आंतरराष्ट्रीय समुदायाला विनंती करतो की त्यांनी अफगाण मीडियाच्या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करावा.

बातम्या आणखी आहेत...