आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Afghanistan News And Updates Hijab Clad Clarissa Ward Calls Taliban Friendly As They Chant Death To America

तालिबानी राजवटीचा प्रभाव:अफगाणिस्तानमध्ये हिजाब घालून दिसली CNN ची पत्रकार, म्हणाली - तालिबानींची वागणूक मैत्रीपूर्ण

काबुल2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 24 तासात रिपोर्टिंगचे रंगरुपच बदलले

अफगाणिस्तानातील सत्ता बदलताच माध्यमांनाही आपला मूड बदलावा लागला. अमेरिकन मीडिया हाऊस सीएनएन चीफ इंटरनॅशनल रिपोर्टर क्लेरिसा वार्ड हिजाबमध्ये दिसल्या. रिपोर्टिंग दरम्यान क्लेरिसा म्हणाल्या की एकीकडे तालिबान 'अमेरिकेचा खात्मा व्हावा' चे नारे देत आहेत आणि दुसरीकडे त्यांची वागणूक बऱ्यापैकी मैत्रीपूर्ण असल्याचे दिसत आहे. हे पूर्णपणे विचित्र आहे.

क्लेरिसा यांचे हिजाब घातलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये क्लेरिसा यांच्या आधीच्या रिपोर्टींगमधील फोटोही शेअर केले जात आहेत. असे सांगितले जात आहे की आधी त्या हिजाब घालत नव्हत्या आणि आता तालिबान्यांच्या राजवटीनंतर त्यांचा पोशाख बदलला आहे.

क्लेरिसा यांनी पोशाखावर दिले स्पष्टीकरण
व्हायरल होणाऱ्या फोटोंवर क्लेरिसा यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्या म्हणाल्या की - हे फोटो चुकीचे आहेत. एक फोटो प्रायव्हेट कम्पाउंडचा आहे (हिजाबशिवाय). इतर फोटोंमध्ये मी तालिबानच्या ताब्यात असलेल्या काबूलच्या रस्त्यावर आहे. यापूर्वीही, जेव्हा मी काबूलच्या रस्त्यांवर रिपोर्टिंग केली होती, तेव्हा मी हिजाब घातला होता. मात्र, ते पूर्णपणे झाकलेले नव्हते. बुरखा राहायचा नाही. थोडा बदल झाला आहे, परंतु पूर्णपणे नाही.

क्लेरिसा यांनी सांगितले महिलांसाठी किती बदलले अफगाणिस्तान
क्लेरिसा सोमवारी अफगाणिस्तानमधील अमेरिकन दूतावासाबाहेर रिपोर्टिंग करत होत्या. त्या म्हणाली की, आता दोन दिवसांपूर्वीच्या तुलनेत, अफगाणिस्तानच्या रस्त्यावर स्त्रीया क्वचितच दिसत आहेत. या व्यतिरिक्त आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे अफगाणिस्तानात तालिबानचे राज्य स्थापन झाल्यानंतर महिला अधिक पारंपारिक आणि पुराणमतवादी कपड्यांमध्ये दिसतात.

24 तासात रिपोर्टिंगचे रंगरुपच बदलले
क्लॅरिसाच्या रिपोर्टिंगच्या समोर आलेल्या व्हिडिओमध्ये ती डोक्यापासून पायापर्यंत बुरख्यामध्ये दिसत आहे. त्यांच्या मागे तालिबानी लढवय्ये दिसत आहेत. अमेरिका संपली पाहिजे, अशा घोषणा देत काही जण जीपवर बसले आहेत. याआधीही क्लेरिसा अफगाणिस्तानमध्ये रिपोर्टिंग करताना दिसल्या होत्या, पण तेव्हा त्यांनी इतका पारंपरिक ड्रेस घातला नव्हता. 15 ऑगस्टच्या एका रिपोर्टिंगमध्ये त्या कुर्ता आणि दुपट्टामध्ये दिसल्या होत्या, पण 16 ऑगस्ट रोजी जेव्हा त्या रिपोर्टिंग करताना दिसल्या तेव्हा त्यांनी हिजाब घातला होता.

क्लेरिसा म्हणाल्या - अफगाणिस्तानमध्ये काम करणाऱ्या रिपोर्टरना धक्का बसला आहे
क्लेरिसा यांनी त्यांचा एका रिपोर्ट म्हटले आहे की, तालिबानच्या ताब्यात आल्यानंतर येथे काम करणारे शूर पत्रकारांनाही धक्का बसला आहे. तालिबान्यांनी सत्ता हस्तगत केल्याने त्यांना धक्का बसला आहे. त्यांना माहित आहे की आता ते निशाण्यावर आहेत, कारण त्यांनी अश्रफ घनी सरकारच्या काळात उघडपणे आणि स्पष्टपणे रिपोर्टिंग केली आहे. पूर्वी ते तालिबानच्या विरोधात बोलत होते आणि आता ते सर्वात मोठे लक्ष्य आहेत.

क्लेरिसा यापूर्वी हिजाबमध्ये दिसल्या आहेत
क्लेरिसा वार्ड हिजाबमध्ये दिसण्याची ही पहिली वेळ नाही. 2016 मध्ये सीरियामध्ये कव्हरेज दरम्यान देखील त्या हिजाबमध्ये दिसल्या होत्या. सीरियन सिव्हिल वॉरदरम्यान, त्यांनी आपल्या एका रिपोर्टिंगमध्ये म्हटले होते की, की आपण हे स्वीकारले पाहिजे की आपण नेहमीच लोकांचा जीव वाचवू शकत नाही. क्लेरिसाने 2006 मध्ये लेबनॉन युद्धादरम्यान बेरूत आणि 2005 मध्ये इराक युद्धाच्या वेळी मोसुल येथूनही रिपोर्टिंग केली आहे.

बातम्या आणखी आहेत...