आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाकिस्तानमध्ये अस्थिरता, आर्थिक दुर्दशा आणि दहशतवाद शिखरावर आहे. हा जगातील सर्वात वाईट देश आहे,जिथे जमावाकडून हत्या करण्याची सर्वात जास्त जोखीम आहे. अर्ली वॉर्निंग प्रोजेक्टच्या एका अहवालानुसार, ही जोखीम दहशतवादी संघटना तालिबानशी संबंधित संघटनांमुळे आहे. दुसरीकडे, पाकिस्तानचा शेजारी आणि तालिबान शासन करणारा अफगाणिस्तान या यादीत सातव्या क्रमांकावर आहे. तेथे तालिबानने कब्जा केल्यानंतर मशिदी आणि अन्य सार्वजनिक ठिकाणांवर हत्या होत आहेत. विशेषत: टार्गेट किलिंग वाढत आहे. मात्र, पाकिस्तानच्या तुलनेत ही स्थिती काहीशी बरी आहे. आयएसआयएस खुरासान गटासह अनेक दहशतवादी संघटना सक्रिय असतानाही सामूहिक हत्येची जोखीम पाकिस्तानापेक्षा कमी आहे.
संशोधन संघटना अर्ली वॉर्निंग प्रोजेक्टने आपल्या अहवालात स्पष्ट केले की, तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान(टीटीपी), इस्लामिक स्टेट(आयएस) आणि स्थानिक गुन्हेगारी गटांमुळे पाकिस्तानात जमावाचा हिंसाचार आणि हल्ले वाढत आहेत. अहवालात सांगितले की, पाकिस्तानात ईशनिंदा कायद्याआडून अतिरेकी संघटना आयएसआयएस हल्ल्याची धमकी देते. यामुळे अल्पसंख्यकांना मोठ्या प्रमाणावर जमावाच्या रूपात गुन्हेगारांकडून लक्ष्य केल्याच्या घटना घडल्या आहेत.
अफगाणिस्तान, त्याशेजारील देशांत लिंचिंगचा धोका
बायडेननी पाकला ठरवले धाेकादायक
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पाकिस्तानला जगातील सर्वात धोकादायक देश संबोधले आहे. बायडेन यांनी सांगितले होते की, पाकिस्तानजवळ कोणत्याही निगराणीशिवाय अण्वस्त्रे आहेत. सध्या चीनकडे ३२० आणि पाकिस्तानकडे १६० अण्वस्त्रे आहेत.
देश शक्यता
पाकिस्तान 16.3%
येमेन 12.9%
म्यानमार 10.8%
अफगाणिस्तान 7.7%
सिरिया 7.3%
इराक 6%
थायलंड 4.9%
चीन 3.1%
इराण 2.4%
७५ लोकांना सुनावणीदरम्यान मारले
१९८० पासून आतापर्यंत ईशनिंदेच्या सुमारे ७५ आरोपींना कोर्टात सुनावणी संपण्याआधी जमावाकडून ठार केले.
श्रीलंकन मॅनेजरची डिसें.२०२१ मध्ये जमावाने हत्या केली.
यूनिसेफनुसार, पाकमध्ये १.९ कोटी, बाल वधू आहेत. ४६ लाख मुुलींचे लग्न वयाच्या १५ वर्षाआधी लावून दिले.
अल्पसंख्याक हिंदूंची स्थितीत सतत वाईट होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.