आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअफगाणिस्तानात तालिबानच्या राजवटीला १५ जून राेजी दहा महिने पूर्ण हाेतील. तालिबानने सहजपणे संपूर्ण देशावर वर्चस्व मिळवले हाेते. परंतु काबूलपासून केवळ १२५ किलाेमीटर असलेल्या पंजशीर खाेऱ्यावर अद्यापही तालिबानची पकड नाही. कारण पंजशीरचे लढवय्ये म्हणजे नाॅर्दर्न अलायन्स फाेर्स अजूनही तालिबानशी संघर्ष करू लागले आहेत. तालिबान विरोधी कमांडर अहमद मसूद व अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह अजून देखील पंजशीरच्या दुर्गम डाेंगराच्या आघाडीवर झुंज देत आहेत. तालिबानचे माहिती विभाग प्रभारी नसरुल्ला मलिकजादा पंजशीर अजूनही ताब्यात नसल्याच्या वृत्ताला फेटाळून लावतात. तेथील संघर्ष थांबल्याचा दावाही ते करतात. परंतु पंजशीरमध्ये किराणा दुकान चालवणारे ६२ वर्षीय गुलजार म्हणाले, राेज येथे बाॅम्बस्फाेट एेकू येतात. तालिबानचाही संघर्ष सुरू आहे.
उझ्बेक, ताजिक सीमेवरून अलायन्सला शस्त्रपुरवठा
नाॅर्दर्न अलायन्सचे एम. कमांडर म्हणाले, आम्हाला उझ्बेकिस्तान व ताजिकिस्तानच्या सीमेवरून गेल्या दहा महिन्यांत शस्त्रांचा पुरवठा हाेत आहे. काही इतर ‘मदतगार’ देशही शस्त्रास्त्र पुरवठा करत आहेत. ते म्हणाले, तालिबानकडे अमेरिकन सैन्याकडून हिसकावलेली शस्त्रे आहेत. परंतु अलायन्सला सातत्याने शस्त्रे मिळू लागली आहेत.
मे महिन्यानंतर संघर्ष वाढला, पंजशीरमधील इंटरनेट बंद दारा गावातील रहिवासी म्हणाले, तालिबानचा शहरी भागात दबदबा आहे. त्यामुळे तालिबानने पंजशीरमध्ये दहा महिन्यांपासून इंटरनेटची सेवा बंद केली आहे. आघाडीसाेबत चकमक झाल्यानंतर वीजपुरवठाही बंद केला जाताे. मे नंतर संघर्षात वाढ झाल्याचे दिसते. दरराेज माेठ्या संख्येने लढवय्ये असलेल्या ट्रकची ये-जा हाेते.त्यामुळे पेच कायम आहे.
डाेंगराळ भागात नाॅर्दर्न अलायन्सच्या लढवय्यांचे प्रशिक्षण 37 चाैरस किमी क्षेत्रफळात पंजशीर खाेरे 10 हजार नियमित सैनिक व ४० रणगाडे आघाडीकडे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.