आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तालिबानने सार्वजनिकरित्या दिला मृत्युदंड:असॉल्ट रायफलमधून गोळ्या झाडल्या, शिक्षा पाहण्यासाठी स्टेडियममध्ये मंत्री आणि लष्करी अधिकारी

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अफगाणिस्तानच्या फराह प्रांतात बुधवारी खुनाचा आरोप असलेल्या एका व्यक्तीला सार्वजनिकरित्या मृत्युदंड देण्यात आला. तालिबानच्या प्रवक्त्याने पुष्टी केली की, स्पोर्ट्स स्टेडियमवर हजारोंच्या जमावासमोर हत्येच्या गुन्हेगाराला मारण्यात आले. अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यानंतर सार्वजनिक मृत्युदंडाची ही पहिलीच घटना आहे.

बीबीसीच्या रिपोर्टनुसार, खुनाचा आरोप असलेल्या व्यक्तीवर लोकांनी भरलेल्या स्टेडियममध्ये मृताच्या वडिलांनी असॉल्ट रायफलने तीन गोळ्या झाडल्या आणि त्याचा मृत्यू झाला. सार्वजनिकरित्या देण्यात आलेली ही शिक्षा पाहण्यासाठी अनेक तालिबानी नेते उपस्थित होते. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश, लष्करी अधिकारी आणि अनेक वरिष्ठ मंत्रीही शिक्षा पाहण्यासाठी आले होते, असे तालिबानचे प्रवक्ते जबिहुल्ला मुजाहिद यांनी सांगितले.

पाच वर्षांपूर्वी गुन्हा केला होता
हेरात प्रांतातील व्यक्तीला तालिबानने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली ती घटना पाच वर्षांपूर्वी घडली होती. यामध्ये तजमीर नावाच्या व्यक्तीने फराह प्रांतातील एका व्यक्तीची हत्या करून त्याची मोटारसायकल आणि फोन चोरला होता. मृताच्या कुटुंबीयांनी आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली, त्यानंतर त्याला तालिबानने अटक केली होती.

गेल्या महिन्यात तालिबानच्या सर्वोच्च नेत्याने शिक्षा जाहीर केली होती
तालिबानचा सर्वोच्च नेता हैबतुल्ला अखुंदजादा याने गेल्या महिन्यात एक घोषणा केली होती. ज्यात सर्व न्यायमूर्तींना आदेश देण्यात आला होता की, दोषींना जाहीर शिक्षा द्यावी. मात्र, कोणत्याही गुन्ह्यासाठी कोणती शिक्षा दिली जाईल, हे तालिबानने अद्याप अधिकृतपणे सांगितलेले नाही.

अफगाणिस्तानच्या फुटबॉल स्टेडियममध्ये नैतिक गुन्ह्यांचा आरोप असलेल्या 12 जणांना हजारोंच्या जमावासमोर मारहाण करण्यात आली होती.
अफगाणिस्तानच्या फुटबॉल स्टेडियममध्ये नैतिक गुन्ह्यांचा आरोप असलेल्या 12 जणांना हजारोंच्या जमावासमोर मारहाण करण्यात आली होती.

सार्वजनिक शिक्षेचा ट्रेंड परत आला
तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यापासून सार्वजनिक फाशीची प्रथा परत आली आहे. 24 नोव्हेंबर रोजी, तालिबानने फुटबॉल स्टेडियममध्ये हजारोंच्या जमावासमोर नैतिक गुन्ह्यांचा आरोप असलेल्या 12 लोकांना मारहाण केली. या 12 जणांमध्ये 3 महिलांचाही समावेश आहे. तालिबानी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या लोकांवर चोरी, व्यभिचार आणि गे सेक्सचे आरोप होते. नोव्हेंबर महिन्यात तालिबानने सार्वजनिक ठिकाणी लोकांना गुन्ह्यासाठी शिक्षा देण्याची ही दुसरी वेळ होती.

गेल्या महिन्यात 19 जणांना अशी शिक्षा झाली आहे
बीबीसीच्या रिपोर्टनुसार, नोव्हेंबरमध्ये अफगाणिस्तानच्या तखार प्रांतातूनही असाच एक प्रकार समोर आला होता, ज्यामध्ये १९ जणांना सार्वजनिक शिक्षा करण्यात आली होती. नूरिस्तान प्रांतात एका महिलेला संगीत ऐकल्यामुळे मारहाण करण्यात आली. या सर्व शिक्षा शरिया कायद्यानुसार दिल्या जात आहेत.

बातम्या आणखी आहेत...