आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Afghanistan Situation: The Central Government Has Called An All Party Meeting On Thursday On The Afghanistan Situation.

अफगाणिस्तान मुद्द्यावर 3.30 तास चालली सर्वपक्षीय बैठक:जयशंकर म्हणाले - सर्व पक्षांचे एकमत, काही भारतीय काबूलमध्ये अडकलेत, सर्वांना लवकरच परत आणू; बैठकीला 31 पक्षांचे 37 नेते होते उपस्थित

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारने गुरुवारी अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर सर्वपक्षीय बैठक घेतली. यामध्ये परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सभागृह नेत्यांना अफगाणिस्तानमधील परिस्थिती आणि बचाव मोहिमेबद्दल सांगितले.

3.30 तास चाललेल्या सर्वपक्षीय बैठकीला 31 पक्षांचे 37 नेते उपस्थित होते. परराष्ट्रमंत्री म्हणाले की, सर्व पक्षांशी चांगली चर्चा झाली आहे. या मुद्द्यावर सरकारसह सर्व पक्षांचे मत समान आहे. ऑपरेशन देवी शक्ती अंतर्गत काबूलमधून बाहेर काढण्यात आलेले बहुतेक लोक भारतीय आहेत. तरीही काही भारतीय काबूलमध्ये अडकले आहेत. आम्ही सर्वांना परत आणू.

तालिबानने दिलेली आश्वासने पाळली नाहीत

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जयशंकर यांनी २०२० मध्ये अमेरिका आणि तालिबान यांच्यात दोहामध्ये झालेल्या कराराचा संदर्भ दिला आणि सांगितले की तालिबान दोहामध्ये दिलेल्या आश्वासनाचे पालन करत नाही.

लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी, राज्यसभेचे नेते मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, द्रमुकचे टीआर बालू, माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा, केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि अनुप्रिया पटेल या बैठकीला उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जयशंकर यांना सर्व पक्षांना अफगाणिस्तानमधील परिस्थितीची माहिती देण्याच्या सूचना दिल्या होत्या. विरोधी पक्षांनीही सरकारला अफगाणिस्तानबाबत निवेदन जारी करण्यास सांगितले आहे.

एअरफोर्स विमानाने आज अफगाणिस्तानातून 35 लोकांना आणले
24 भारतीय आणि 11 नेपाळी हवाई दलाच्या विमानाने काबूलहून आज दिल्लीत दाखल झाले आहेत. अफगाणिस्तानातील लोकांना विमानात नेण्याबरोबरच तेथील परिस्थितीवर सरकार बारीक लक्ष ठेवून आहे. आतापर्यंत अफगाणिस्तानातून 800 लोकांना भारतात आणण्यात आले आहे.

मोदी म्हणाले होते - दहशतवाद मानवतेला जास्त काळ दडपू शकत नाही
शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अफगाणिस्तानविषयी एका कार्यक्रमादरम्यान सांगितले की "दहशतवादाच्या आधारावर एक साम्राज्य निर्माण करण्याची कल्पना आहे, ती काही कालावधीसाठी काही काळ वर्चस्व गाजवू शकते, परंतु तिचे अस्तित्व कधीही कायमचे नसते. ते मानवतेला जास्त काळ दडपू शकत नाही."

तालिबानबाबत भारताची भूमिका काय आहे?
काही दिवसांपूर्वी जयशंकर प्रसाद म्हणाले होते की आम्ही सध्या वेट अॅण्ड वॉचच्या भूमीकेत आहोत. तेथील परिस्थिती आता स्थिर आहे. आमचे लक्ष फक्त भारतीयांना बाहेर काढणे आणि संरक्षित करण्यावर आहे. ते म्हणाले की, अफगाणिस्तानसोबत आपले ऐतिहासिक संबंध आहेत. अफगाण लोकांशी आमचे संबंध नक्कीच चालू राहतील. संयुक्त राष्ट्रात भारताचे राजदूत टीएस तिरुमूर्ती म्हणाले होते की तालिबानने हिंसाचाराचा मार्ग सोडून द्यावा आणि दहशतवादी संघटनांशी संबंध संपवावेत.

पंतप्रधान मोदींनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी अफगाणिस्तानवर सुमारे 45 मिनिटे फोनवर संवाद साधला. भारताने अफगाणिस्तानमधील आपले दूतावास रिकामे केले आहे, परंतु रशियाने आपले मिशन कायम ठेवले आहे.

भारताबद्दल तालिबानची भूमिका काय आहे?
तालिबानचे प्रवक्ते जबीउल्ला मुजाहिद यांनी म्हटले आहे की तालिबान भारताशी चांगले संबंध निर्माण करण्यास उत्सुक आहे. भारत महत्त्वाचा आहे आणि त्याने अफगाण लोकांच्या इच्छेवर आधारित स्वतःचे मत बनवावे अशी आमची इच्छा आहे. आम्ही वचन देतो की आम्ही आमची जमीन कोणत्याही देशाविरुद्ध वापरू देणार नाही.

बातम्या आणखी आहेत...