आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Afghanistan Taliban News | Pulitzer Prize Winning Photo Journalist Danish Siddiqui Chief Photographer For Reuters In India Was Killed In Afghanistan; News And Live Updae

अमेरिकन मासिकाचा दावा:भारतीय फोटो पत्रकार दानिश सिद्दीकी यांना तालिबान्यांनी जिवंत पकडले होते, ओळख पटताच केली निर्घृण हत्या

वॉशिंग्टन2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हल्लेच्या वेळी दानिश लष्करापासून वेगळे झाले होते

भारतीय फोटो पत्रकार दानिश सिद्दीकी यांचा काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानमध्ये मृत्यू झाला होता. दानिश सिद्दीकी यांचा मृत्यू क्रॉस फायरिंगमध्ये झाला नसून तालिबान्यांनी केला असल्याचा दावा वॉशिंग्टन एक्झामिनर मासिकात करण्यात आला आहे. पुलित्झर पुरस्कार विजेता दानिश सिद्दीकी यांची 16 जुलै रोजी तालिबान आणि अफगाण सैन्याने केलेल्या क्रॉस गोळीबारात ठार झाल्याचे उघड झाले होते. दानिश रॉयटर्सच्या वतीने ही स्टोरी कव्हर करत होते.

काही माध्यमांच्या माहितीनुसार, दानिश गेल्या काही दिवसांपासून अफगाण सैन्यासोबत हा संघर्ष कव्हर करत होते. त्यांनी स्वत: आपल्या सोशल मीडिया हँडलवरुन यासंदर्भांत माहिती दिली होती. मासिकाच्या मते, सिद्दीकीच्या मृत्यूची परिस्थिती आता स्पष्ट झाली आहे आहे. तो गोळीबारात मारला गेला नाही जा तालिबान्यांनी निर्घृणपणे त्यांची हत्या केली आहे.

हल्लेच्या वेळी दानिश लष्करापासून वेगळे झाले होते
अहवालानुसार, दानिश गेल्या काही दिवसांपासून अफगाण सैन्यासोबत स्पिनमधील बोल्डक भागात होते असे एका अफगाण अधिकाऱ्याने सांगितले आहे. परंतु, ज्यावेळी दहशतवाद्यांकडून हल्ला झाला त्यावेळी अफगाणी सैन्य दोन तूकडीत विभागले गेले. दरम्यान, या हल्ल्यात दानिश जखमी झाले आणि तेथे असलेल्या एका मस्जिदीचा सहारा घेतला. परंतु, ही माहिती जेंव्हा तालिबान्यांनी माहित झाली त्यावेळी त्यांनी मस्जिदमध्ये येत दानिश आणि उपस्थित असलेल्या सैन्यांना ठार केले.

दानिशच्या मृत्यूचे 3 मोठे दावे

  • तालिबान्यांच्या हल्ल्यात जखमी झाल्यानंतर दानिश एका टीमसोबत मस्जिदमध्ये गेले.
  • जेंव्हा ही गोष्ट दहशतवाद्यांना कळाली तेंव्हा ते मस्जिदीत पोहोचले.
  • दानिशची ओळख पटताच दहशतवाद्यांनी दानिश आणि त्यांच्या टीमला ठार केले.
बातम्या आणखी आहेत...