आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातील अफगाणी विद्यार्थ्यांना भीती:पुण्यातील अफगाणी विद्यार्थ्यांनी मांडल्या व्यथा, म्हणाले- तालिबानी सत्ता आल्यामुळे पुन्हा महिला हत्याकांड सुरू होतील; अनेकांचा कुटुंबियांशी तुटला संपर्क

पुणे2 महिन्यांपूर्वीलेखक: आशिष राय
  • कॉपी लिंक
  • तालिबान स्वतःला बदलण्याबद्दल बोलत असतील, पण पुण्यात राहणारे अफगाणी विद्यार्थी ते बदलले आहेत यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत.

तालिबान्यांनी जवळजवळ संपूर्ण अफगाणिस्तान काबीज करत सत्तेची सूत्रे हातात घेतली आहेत. जवळजवळ 20 वर्षांनंतर तालिबानच्या पुनरागमनाने केवळ अफगाणिस्तानातच नव्हे तर पुण्यातील विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. तालिबान स्वतःला बदलण्याबद्दल बोलत असतील, पण पुण्यात राहणारे अफगाणी विद्यार्थी ते बदलले आहेत यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. या विद्यार्थ्यांना भीती वाटते की पुन्हा अफगाणिस्तानात रस्त्यावर महिला आणि शिक्षित लोकांचे हत्याकांड सुरू होऊ शकते.

पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात (पुणे विद्यापीठ) पॉलिटिक्स अॅण्ड पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशनचे शिक्षण घेत असलेला 26 वर्षीय मुजामिल साबीर हा मुळचा अफगाणिस्तानातील कुंदूज प्रांतातील आहे. त्याच्या वडिलांचा तिथे चांगला व्यवसाय आहे. मुजामिल तीन वर्षांपासून पुण्यात राहत आहे.

मुजामिलने सांगितले की, तालिबानने कुंदुज ताब्यात घेतले आहे. कुटुंबातील लोकांशी बोलणे होत आहे, परंतु ते गेल्या 5 दिवसांपासून त्यांच्या घरात बंद आहेत. तेथे फक्त वाहनांचा आवाज, गोळीबार आणि रस्त्यांवर धावणाऱ्या रुग्णवाहिका ऐकू येतात. रात्रीसुद्धा गोळीबाराचा आवाज येतो, ज्यामुळे घाबरलेले कुटुंबीय मला व्हिडिओ कॉलवर पाहून रडू लागतात. ते मला परत न येण्यास सांगत आहेत. मला भीती वाटू लागली आहे की कदाचित मी आता त्यांना भेटू शकणार नाही.

मुजामिल साबीर हा मुळचा अफगाणिस्तानच्या कुंदुज प्रांताचा असून गेल्या तीन वर्षांपासून तो पुण्यात राहत आहे.
मुजामिल साबीर हा मुळचा अफगाणिस्तानच्या कुंदुज प्रांताचा असून गेल्या तीन वर्षांपासून तो पुण्यात राहत आहे.

पाकिस्तानमुळे तालिबान झाला बळकट
मुजामिल सांगतो की पुण्यात जीवन चांगले आहे. येथील लोक मदतीला कधीही तयार असतात, पण माझे कुटुंब संकटात आहे. जरी शरीर येथे आहे, तरीही माझा आत्मा तेथे आहे. मला सतत माझ्या कुटुंबाची काळजी वाटते. आमच्या सरकारने आम्हाला तालिबानी दहशतवाद्यांच्या हवाली केले आहे. पाकिस्तानमुळे तालिबानला बळ मिळाले. शस्त्रांपासून ते पैशापर्यंत त्यांनीच पुरवले.

मुजामिलला वाटते की पुन्हा अफगाणिस्तानात 20 वर्षांनंतर भीतीचे साम्राज्य परतणार आहे. तो म्हणाला, 'मी लहान होतो, पण मी तालिबानची क्रूरता पाहिली आहे. ते उघडपणे स्त्रिया आणि सुशिक्षित लोकांवर अत्याचार करायचे.

फौजाना अफगाणिस्तानातील वारदाक येथील राहणारी आहे आणि गेल्या तीन वर्षांपासून ती पुण्यात राहत आहे.
फौजाना अफगाणिस्तानातील वारदाक येथील राहणारी आहे आणि गेल्या तीन वर्षांपासून ती पुण्यात राहत आहे.

एका महिन्यात तालिबानने 20 वर्षे मागे ढकलली
पुणे विद्यापीठात शिकत असलेल्या फैजाना मिरी म्हणाली की आम्ही 20 वर्षे आपले आयुष्य सुधारण्याचा प्रयत्न केला. अन्नासारख्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा सर्व काही ठीक होते तेव्हा पुन्हा तालिबान त्यांना लुबाडायला आला. गेल्या एका महिन्यात तालिबानने आम्हाला 20 वर्षे मागे ढकलले. आम्ही तुटलेले नाही आणि आम्ही पुन्हा उभे राहू आणि त्याविरुद्ध लढू.

अनेक विद्यार्थ्यांचा कुटुंबाशी संपर्क तुटला
अफगाण विद्यार्थी संघटना, पुणेचे अध्यक्ष वाली रहमान रहमानी यांनी सांगितले की, येथे राहणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांचा सोमवार दुपारपासून त्यांच्या कुटुंबांशी संपर्क तुटला आहे. पुण्यातील एका खासगी विद्यापीठातून एमबीए केलेल्या शुक्रुल्ला अहमदी (25) यांनी सांगितले की, गेल्या तीन दिवसांपासून ते अफगाणिस्तानातील त्यांच्या कुटुंबाशी बोलले नाहीत.

कुटुंबापासून दूर पण सुरक्षित
अहमदीने सांगितले की त्याच्या कुटुंबात आई आणि तीन मोठे भाऊ आहेत. 2018 मध्ये तो शेवटच्या वेळी त्याच्या घरी गेला होता. तो म्हणाला की भारत सरकारने त्या विद्यार्थ्यांचा व्हिसा वाढवावा ज्यांचा मुक्काम लवकरच संपत आहे. कारण यावेळी अफगाणिस्तानात परत जाणे अत्यंत धोकादायक आहे. अहमदी म्हणाला, “आम्ही तिथे गेलो तर आम्ही सुरक्षित राहणार नाही. आम्ही आमच्या कुटुंबापासून दूर आहोत, पण किमान इथे सुरक्षित आहोत. ”

सर्व ठीक झाल्यानंतरच विद्यार्थ्यांना घरी परतायचे आहे
वालीच्या मते, अफगाणिस्तानातील सुमारे 3,000 विद्यार्थी पुणे शहरातील विविध संस्थांमध्ये शिक्षण घेत आहेत. ते म्हणाले, "आम्ही भारत सरकारला विनंती करत आहोत की परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत त्यांचा व्हिसा वाढवा."

पुणे विद्यापीठात शिकणाऱ्या अफगाण विद्यार्थ्यांनी मंगळवारी येथे बैठक घेऊन भविष्यासाठी धोरण ठरवले.
पुणे विद्यापीठात शिकणाऱ्या अफगाण विद्यार्थ्यांनी मंगळवारी येथे बैठक घेऊन भविष्यासाठी धोरण ठरवले.
बातम्या आणखी आहेत...