आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफगाणिस्तान:तालिबानींच्या भीतीने आठवड्याला 30 हजार अफगाणी देशातून बाहेर, कंदहार विमानतळावर दहशतवाद्यांनी डागले तीन रॉकेट

काबूल (क्रिस्टिना गोल्डबाम, फातिमा फैजिक )2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बेकायदा स्थलांतराचे प्रमाण ३० ते ४० टक्क्यांनी वाढले

अफगाणिस्तानात तालिबानींचा कहर सुरूच आहे. दहशतवाद्यांनी कंदहार विमानतळावर तीन रॉकेट डागले. त्याचबरोबर कंदहार शहराला चोहोबाजूने घेराव टाकला आहे. सुरक्षा दल तालिबानी दहशतवाद्यांशी सतत संघर्ष करत होते. कंदहार विमानतळाचे प्रमुख मसूद पश्तून म्हणाले, शनिवारी उशिरा रात्री विमानतळावर हल्ला करण्यात आला. दहशतवाद्यांनी तीन रॉकेट डागले. त्यापैकी दोन रॉकेट धावपट्टीवर धडकले. त्यामुळे सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली. अमेरिकी सैनिक मायदेशी परतल्याने तालिबानींच्या कारवायांत वाढ झाली आहे. स्थलांतरासंबंधी आंतरराष्ट्रीय संस्थेच्या म्हणण्यानुसार वाढत्या हिंसाचारामुळे दर आठवड्याला सुमारे ३० हजारावर अफगाणी भीतीने देश सोडून जात आहेत. आतापर्यंत ३ लाख ३० हजार अफगाणी नागरिकांनी देश सोडला. त्यापैकी काही अमेरिकी सैन्यासोबत गेले. ३० ते ४० टक्के बेकायदा स्थलांतर आहे.

बेकायदा स्थलांतराचे प्रमाण ३० ते ४० टक्क्यांनी वाढले
छायाचित्रातील भिंतीवर अफगाणिस्तानातील लोकांनी पलायन करू नये, असे आवाहन करणारा संदेश आहे. परंतु काबूलच्या या पासपोर्ट कार्यालयात दररोज लोकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. कारण त्यांना तालिबानमुळे देश सोडायचा आहे.

पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) मोईद युसूफ म्हणाले, देश आता आणखी अफगाण स्थलांतरितांना स्वीकारू शकत नाही. अफगाणिस्तानात या नागरिकांची व्यवस्था व्हावी ही आंतरराष्ट्रीय समुदायाची जबाबदारी आहे. त्यासाठी याेग्य ती पावले उचलण्यात यायला हवी. अफगाणिस्तानात गृहयुद्धाला सुरूवात झाल्यास स्थलांतरितांना पाकिस्तानकडे ढकलून देणे योग्य होणार नाही, असे मोईद यांनी सांगितले.

पाकला आणखी स्थलांतरित अमान्य
अमेरिकेने सैन्य कारवाईसाठी मदत करणाऱ्या अफगाणी नागरिकांना सोबत घेऊन जाण्यासाठी विशेष मोहिम हाती घेतली आहे. त्यांना लष्करी विमानाने नेले जात आहे. १८ हजारावर लोकांनी अमेरिकी सैन्य किंवा लष्करी मोहिमेत मदत केली होती. त्यांच्या कुटुंबियांना धरून एकूण संख्या ५० हजारावर जाते. गेल्या गुरूवारी केवळ २०० जणांना अमेरिकेत नेण्यात आले होते. या प्रक्रियेत अमेरिकेची मंद व्हिसा प्रणाली अडचणीची ठरत आहे.