आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Afghanistan War Vs Taliban Update; Narendra Modi Govt Appeal Indians To Leave Mazar E Sharif; News And Live Updates

अफगाणिस्तानमध्ये तालिबानची भीती:भारत सरकारने मजार-ए-शरीफमधून आपल्या कर्मचाऱ्यांना बोलावले परत; भारतीय नागरिकांनी लवकरात लवकर निघावे - अॅडव्हायजरी जारी

काबूल2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंधारमधून 11 जुलै रोजी काही डिप्लोमेट्संना बोलवण्यात आले

अफगाणिस्तानात गेल्या काही दिवसांपासून तालिबान आणि अफगाणी सैन्य यांच्यात तणाव वाढतच आहे. तालिबानच्या वाढत्या सामर्थ्यामुळे अफगाणिस्तानची परिस्थिती बिकट होत आहे. अफगाणिस्तानातील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या मजार-ए-शरीफच्या बहुतेक भागांवर तालिबानने ताबा मिळवला आहे. याच पार्श्वभूमीवर भारत सरकारने आपल्या नागरिकांना ते शहर सोडण्यासाठी अॅडव्हायजरी जारी केली आहे.

मजार-ए-शरीफ येथून एक विशेष विमान मंगळवारी संध्याकाळी दिल्लीसाठी उड्डाण करणार आहे. शहरात असलेले कोणतेही भारतीय नागरिक भारतात परतण्यासाठी या विमानात प्रवास करु शकतात. प्रवासासाठी त्यांना त्यांच्या पासपोर्टचा तपशील व्हॉट्सअॅपवर पाठवावा, असा संदेश मजार-ए-शरीफमधील भारतीय दूतावासाने सोशल मीडियावर सांगितला आहे.

भारतीय दूतावासाने नागरिकांना व्हॉट्सअॅपवर आवश्यक माहिती पाठवण्यास सांगितले आहे.
भारतीय दूतावासाने नागरिकांना व्हॉट्सअॅपवर आवश्यक माहिती पाठवण्यास सांगितले आहे.

कंधारमधून 11 जुलै रोजी काही डिप्लोमेट्संना बोलवण्यात आले
भारत सरकारने मजार-ए-शरीफ दूतावासात काम करणाऱ्या बहुतेक कर्मचाऱ्यांनाही परत बोलावते आहे. संध्याकाळी मजार-ए-शरीफ येथून येणाऱ्या एका विशेष विमानाने यांना भारतात पाचारण केले जाणार आहे. गेल्या एका महिन्यात भारतीय डिप्लोमेट्संना बोलवण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 11 जुलै रोजी कंदहार दूतावासातून डिप्लोमेट्संना बोलावण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...