आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Afghanistan Women Girls Crisis | Women And Girls Of Afghanistan Forced Into Marriage At Kabul Airport Due To Fear Of Taliban Now US On Alert; News And Live Updates

तालिबानची दहशत:देश सोडून जाण्यासाठी अफगाण मुलींचे काबूल विमानतळाबाहेर लग्न; ही मानवी तस्करी असल्याचे अमेरिकेने केले मान्य

काबुल/वॉशिंग्टन12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुलींनी स्वतः उघड केले प्रकरण

तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर ताबा मिळवताच रंग दाखवला सुरुवात केली आहे. देशातील अफघाणी लोक प्रचंड घाबरलेले असून देश सोडून जाण्याची तयारी करत आहे. परंतु, जगाला अफगाणिस्तानातील पुरुषांपेक्षा तिथल्या महिला आणि मुलींची सर्वात काळजी वाटत आहे. अफगाणिस्तानातील परिस्थिती किती भयावह आहे, हे खालील गोष्टींवरुन समजून येईल. अनेक अफघाणी लोक देशातून बाहेर जाण्यासाठी आपल्या मुलींचे लग्न विमानतळाबाहेर लावत आहे. या मुली तालिबानी दहशतवाद्यांच्या हातात पडू नये यासाठी लग्न लावण्यात आले असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे अफगाणिस्तानवर तालिबान्यांची किती दहशत आहे हे समजते. या सर्व घटना 30 ऑगस्टपूर्वीच्या आहेत.

सदरील प्रकरणाची माहिती अमेरिकन प्रशासनाला मिळाली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने या घटनांबाबत सविस्तर माहिती देत ​​गृह आणि संरक्षण मंत्रालयाला सतर्क राहण्यास सांगितले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाचा तपासही सुरू करण्यात आला आहे. अमेरिकेने ही मानवी तस्करी असल्याचे मान्य केले आहे.

मानवी तस्करी प्रकरण
सीएनएनने अमेरिकन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही बाब उघड केली आहे. या अहवालानुसार, हे मानवी तस्करीचे प्रकरण असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. अफगाण पालकांनी किंवा मुलींनी हा निर्णय तालिबान्यांच्या दहशतीमुळे आणि मजबुरीत घेतले आहे.

मुलींनी स्वतः उघड केले प्रकरण
सर्वात आधी हे प्रकरण यूएईमध्ये समोर आले. अफगाणिस्तातून बाहेर काढलेल्या लोकांना अमेरिकेने दुसऱ्या देशातील निर्वासित छावण्यांमध्ये ठेवले आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या लोकांना अमेरिकेत किंवा दुसऱ्या देशात पाठवले जाईल. दरम्यान, यूएईमध्ये तपासणीच्या वेळी काही मुलींनी हे प्रकरण समोर आणले. घाईगडबडीत आमच्या पालकांनी आमचे लग्न काबूल विमानतळाबाहेर लावले असे या मुलींना अमेरिकन अधिकाऱ्यांना सांगितले. या मुलींच्या मते, तालिबानच्या राजवटीत त्यांनी त्यांच्या देशात राहावे अशी त्यांच्या पालकांची इच्छा नव्हती. कारण त्या मुली तालिबानी दडपशाहीला बळी पडू शकतात असे पालकांचे मत असल्याचे मुलींना सांगितले.

काही प्रकरणात मुलांना दिले पैसे
अहवालानुसार, काही प्रकरणे धक्कादायक आणि आश्चर्यकारक आहेत. मुलींच्या पालकांनी विमानतळाबाहेर अशा मुलांचा शोध केला, ज्यांच्याजवळ देशाबाहेर जाण्याचे अधिकृत कागदपत्रे आहेत. विशेष म्हणजे त्यांना मोठी रक्कम देत आपल्या मुलींचे त्याच्यासोबत लग्न केले. जेणेकरुन या मुली हा देश सोडून बाहेर जातील. काही प्रकरणांमध्ये, मुलांनी पैसे घेत ही आपली पत्नी असल्याचे सांगितले आणि नंतर त्यांना अफगाणिस्तानातून बाहेर नेले.

बातम्या आणखी आहेत...