आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Afghanistan's Change Of Government Without Discussion; Violence Can Be A Means To An End: Narendra Modi

अफगाणिस्तानवर बोलले मोदी:अफगाणिस्तानचा सत्ताबदल चर्चेविना; हिंसेद्वारे सत्ता मिळवण्यास प्रोत्साहन मिळू शकते : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अफगाणिस्तानमध्ये तालिबानी कब्जावर भारताची प्रथमच कठोर टिप्पणी

अफगाणिस्तानमध्ये तालिबानने कब्जा मिळवल्यानंतर भारतातर्फे प्रथमच स्पष्ट टिप्पणी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘अफगाणिस्तानातील सत्ताबदल चर्चेविना झालेला आहे, तो सर्वसमावेशक नाही. त्यामुळे इतर कट्टरपंथी संघटनांनाही हिंसेद्वारे सत्ता मिळवण्यास प्रोत्साहन मिळू शकते. अफगाणिस्तानमध्ये अस्थिरता आणि कट्टरता कायम राहिली तर जगभरात दहशतवाद आणि कट्टरतावादाला प्रोत्साहन मिळेल. भारतासारख्या शेजारी देशांवर त्याचा सर्वाधिक परिणाम होईल.’

पंतप्रधानांनी शुक्रवारी शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) वार्षिक शिखर बैठकीला व्हर्च्युअल माध्यमाद्वारे संबोधित करताना ही टिप्पणी केली. ते म्हणाले, ‘अफगाणिस्तानमधील सध्याच्या स्थितीमुळे अमली पदार्थांचा व्यवसाय, अवैध शस्त्रास्त्रांचा पुरवठा आणि मानव तस्करी अनियंत्रित रूप घेऊ शकते. तेथे लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.’

इम्रान यांच्या उपस्थितीत कट्टरतावादावर सल्ला
ताजिकिस्तानची राजधानी दुशांबेत शुक्रवारी झालेल्या बैठकीत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानही हजर होते. कट्टरतावादाबाबत सल्ला देताना मोदी म्हणाले, या विभागात शांतता, सुरक्षितता आणि विश्वासातील कमतरता ही प्रमुख आव्हाने आहेत. अफगाणिस्तानमध्ये घटनाक्रमांनी आव्हाने आणखी स्पष्ट केली आहेत. इस्लामशी संबंधित उदारवादी, सहिष्णू तसेच समावेशक संस्था आणि परंपरांदरम्यान मजबूत संपर्क विकसित करण्यासाठी एससीओने काम करायला हवे.

बातम्या आणखी आहेत...