आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअफगाणिस्तानातील सामाजिक, आर्थिक घडी विस्कळीत होण्याचा धोका निर्माण झाला आहे, असा इशारा संयुक्त राष्ट्राने दिला आहे. तालिबानची चिंता सोडून अफगाणिस्तानचा निधी रोखू नका. कारण परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते, असे संयुक्त राष्ट्राचे राजदूत देबोराह लियोन्स यांनी स्पष्ट केले आहे. अफगाणिस्तानातील संयुक्त राष्ट्राच्या कार्यालयावर हल्ला केला आहे. त्याचदरम्यान संयुक्त राष्ट्राची भूमिका जाहीर झाली आहे. संयुक्त राष्ट्राच्या कार्यालयातील अफगाणी लोकांना सातत्याने तालिबानच्या धमक्या मिळू लागल्या आहेत. त्याबद्दल विशेष दूत डेबोराह लियोन्स यांनी सुरक्षा परिषदेत दिली आहे. ते म्हणाले, १० ते २५ ऑगस्ट या काळात अशा प्रकारच्या घटनांत जास्त वाढ झाली. संयुक्त राष्ट्राचे अफगाणमधील कर्मचारी अतिशय कठीण काम करू लागले आहेत.
संयुक्त राष्ट्रालादेखील महत्त्वाची कामे पूर्णत्वाकडे नेत असताना मोठ्या आव्हानांना तोंड द्यायची वेळ आली आहे. अफगाणी कर्मचाऱ्यांच्या जीविताला धोका आहे. तालिबानच्या वर्चस्वानंतर सेंट्रल बँकेच्या सुमारे १० अब्ज डॉलरची संपत्ती परदेशात गोठवण्यात आली आहे. त्याशिवाय ४४ कोटी डॉलरची रक्कम रोखण्यात आली आहे. अशा परिस्थितीत अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी काही महिन्यांचा वेळ दिला पाहिजे. राजदूत लियोन्स म्हणाले, तालिबानला सत्तेसाठी संधी दिली पाहिजे. मानवी हक्क, दहशतवादापासून दूर राहून सरकार चालवण्याची तालिबानची खरी तयार आहे का? हेदेखील पाहण्याची वेळ आली आहे.
सालेह यांच्या भावाची अमानुषपणे हत्या
तालिबानने अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांचे थोरले बंधू राेहुल्ला सालेह यांची हत्या केली. सालेह यांना पंजशीर खोऱ्यातच ठार करण्यात आले. सालेहला आधी चाबकाने व नंतर विजेच्या तारेने मारहाण झाली. त्यानंतर त्यांचा गळा कापण्यात आला. त्यानंतर तडफडणाऱ्या सालेह यांना गोळ्या घातल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.