आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादळामुळे जनजीवन उद्‌ध्वस्त:अमेरिका 40 वर्षांनंतर ‘बम चक्रीवादळा’ ने केले उद्‌ध्वस्त

वाॅशिंग्टन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेच्या उत्तर कॅलिफोर्नियात आलेल्या “बम चक्रीवादळा’ने ३ लाखांहून अधिक लोकांच्या घर आणि कार्यालयातील वीज गुल झाली. वादळामुळे आतापर्यंत कमीत कमी ५ जणांचा मृत्यू झाला आहे. ३ वर्षांपासून पडलेल्या दुष्काळानंतर आलेल्या या वादळामुळे जनजीवन उद्‌ध्वस्त झाले आहे. अमेरिकी राष्ट्रीय हवामान सेवेनुसार(एनडब्ल्यूएस) लॉस एंजलिस क्षेत्रात आलेले वादळ मार्च १९८३ नंतर आलेले सर्वात भयंकर वादळ आहे. ट्रान्सफाॅर्मर फुटल्यामुळे वृक्ष उन्मळून पडले आणि विजेचा खांब मोडला. कारच्या खिडक्या तुटल्या. नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशननुसार, कॅलिफोर्नियामध्ये वादळे कमी येतात आणि सरासरी दरवर्षी १० पेक्षा कमी आहे.