आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्युत्तरात कोरियाने तीन क्षेपणास्त्रे डागली:77 वर्षांनंतर द. कोरियाच्या सरहद्दीत डागले क्षेपणास्त्र

सेऊलएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरिया क्षेत्रात तणावानंतर युद्धाचे ढग जमू लागले आहेत. उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग उनने बुधवारी दक्षिण कोरियावर सात तासांत २३ क्षेपणास्त्रे डागली. त्यापैकी एक क्षेपणास्त्र दक्षिण काेरियाच्या सागरी क्षेत्रात पडले. ७७ वर्षांत पहिल्यांदाच उत्तर कोरियाचे क्षेपणास्त्र दक्षिण कोरियाच्या भागात डागण्यात आले. दक्षिण कोरियाने त्याला प्रत्युत्तर देताना तीन क्षेपणास्त्रे डागली. क्षेपणास्त्र डागण्यात आल्यामुळे या क्षेत्रातील तणाव आणखीन वाढला आहे. दक्षिण कोरियाने उत्तर कोरियाला एक आैपचारिक इशारा देणारा संदेश पाठवला आहे. उन यांनी आपल्या सैन्याला चिथावणी देण्याचे काम करू नये. अशी कारवाई बंद करण्यात यावी. दक्षिण कोरियात हवाई हल्ल्यासाठी सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.

निगराणीमुळे किमची झोप उडाली दक्षिण कोरिया व अमेरिका यांच्यात संयुक्त ‘व्हिजिलेंट स्टॉर्म’ हा लष्करी सराव सुरू आहे. त्यामुळे उन यांची झोप उडाली आहे. सोमवारपासून सुरू झालेला हा सराव पाच दिवस चालेल. त्यात २४० लढाऊ विमाने सहभागी झाली. त्यांची १६०० उड्डाणे होतील.

बातम्या आणखी आहेत...