आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासौदी अरेबियाच्या मदिनात शनिवारी इंडोनेशियातील पहिले परदेशी यात्रेकरू येथे दाखल झाले. कोरोनामुळे लावलेले दोन वर्षांपासूनचे निर्बंध हटवण्यात आले आहेत. यंदा ७९ हजार २३७ भारतीय हज यात्रेवर जातील. त्यात ५० टक्के महिला आहेत.
५६ हजार ६०१ भारतीय मुस्लिम हज कमिटी ऑफ इंडिया व २२ हजार ६३६ मुस्लिम हज ग्रुप ऑर्गनायझर्सच्या माध्यमातून हजला जातील. पुरुष सहकाऱ्याशिवाय सुमारे २००० मुस्लिम महिला हजला जातील. १० लाख भाविकांना यंदा परवानगी दिली जाईल, अशी घोषणा सौदी अरेबियाने जुलैमध्ये केली होती. हा आकडा गेल्या वर्षी सुमारे ६० हजार व २०२० मध्ये १ हजार होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.