आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाँगकाँग:पत्रकारांनंतर आता चीनच्या निशाण्यावर वकील

हाँगकाँग8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हाँगकाँगमध्ये पत्रकारांच्या दडपशाहीनंतर चीन आता वकिलांना निशाण्यावर घेत आहे. हाँगकाँगमध्ये राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित कायद्यात बदल केला आहे. यात देशद्रोहाच्या आरोपींसह त्यांची केस लढणाऱ्यांचीही चौकशी होईल. यामुळेच अधिकाऱ्यांनी वकिलांवर दबाव वाढवला आहे. आता हाँगकाँगमध्ये काम न करण्याचा निर्णय वरिष्ठ मानवी हक्काचे वकील मायकल विडलर यांनी घेतला आहे. कारण इथे काम करणे खूप धोकादायक झाले आहे. वस्तुत: २०१९ च्या अशांततेनंतर अटक केलेल्या १० हजार आंदोलकांपैकी काहींचा बचाव वकिलांनी केला होता. त्यांच्यावर आता अधिकाऱ्यांनी कारवाई सुरू केली आहे. प्रसिद्ध विधिज्ञ मार्गारेट एन. जी. यांनाही कार्यकर्त्यांना आर्थिक मदत दिल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. मायकल विडलर सांगतात, एका ग्राहकाकडे माझे एक कार्ड होते. या कार्डमुळे ती व्यक्ती माझ्या संस्थेकडून कायदेशीर सल्ला घेते, असे अधिकाऱ्यांना वाटले. न्यायाधीश स्टॅनली चॅन यांनी त्याच कार्डचा हवाला देत विडलर व त्यांच्या संस्थेला बेकायदेशीर ठरवले आहे.

बातम्या आणखी आहेत...