आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मॉस्को:पतीची हत्या करून मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवले, वॉशिंग मशीनने धुतले

मॉस्को3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रशियातील प्रसिद्ध पॉप सिंगरच्या हत्येचे बिंग फुटले

रशियातील प्रसिद्ध पॉप सिंगर व रॅपर अँडी कार्टवाइट (३०) याची पत्नी मरीना कुखा हिने त्याची क्रूर हत्या केली. त्यानंतर त्याच्या शरीराचे तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवले आणि वॉशिंग मशीनमध्ये धुतले. पोलिसांनी दिलेल्या अहवालात हा प्रकार उघडकीस आला. तत्पूर्वी मरीनाने त्याचा सेंट पीटर्सबर्गमध्ये ड्रग ओव्हरडोसमुळे मृत्यू झाल्याचे सांगितले होते.

परंतु अहवालात अँडीच्या शरीरात ड्रग्ज सापडलेच नसल्याचा स्पष्ट झाले. मरीनाने सांगितले, अँडीचा मृत्यू ड्रगमुळे झाल्याचे त्याच्या चाहत्यांना कळू नये, असा माझा प्रयत्न होता. तिने सांगितले, चार दिवस अँडीच्या शरीराचे तुकडे करत होते. त्यानंतर वेगवेगळे तुकडे प्लास्टिक बॅगमध्ये भरुन फ्रिजमध्ये ठेवले. नंतर हे तुकडे जोडून त्यावर मीठ टाकले आणि एकत्र शिवले. रशियन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी खुनाचा गुन्हा नोंदवण्यात येऊन तपास सुरू केला आहे. मरीनाने अँडीची हत्या का केली, यासाठी तिची चौकशी सुरू आहे. मरीनाने सांगितले, अँडीला लॉकडाऊन काळात ड्रग्जची सवय लागली होती. त्यामुळे मी संतापले. या हत्येत माझ्या आईने मदत केली.