आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:‘गुगल’वर लक्षणे वाचून डॉक्टरला विश्वासात घेत मुले आजारी असल्याचे पालकच सांगताहेत; हा तर मुलांवर अन्याय : तज्ज्ञ

लंडनएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ब्रिटनमध्ये काल्पनिक आजार सांगण्याचा प्रकार वाढला, रॉयल कॉलेजला दिशानिर्देश जारी करावे लागले

ब्रिटनमध्ये मुलांचे डॉक्टर खूप त्रस्त आहेत. मुलांमध्ये विविध प्रकारच्या आजारांची लक्षणे असल्याचे सांगत पालक त्यांना डॉक्टरकडे आणत आहेत. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर कुठलाही आजार आढळत नाही. मुलाला आजार आहे हे डॉक्टरांना सांगण्याचा प्रयत्न पालक करतात. अनेकदा ते त्यात यशस्वीही होतात. असे प्रकार वारंवार होत आहेत. त्यामुळे रॉयल कॉलेज ऑफ पीडियाट्रिक्स अँड चाइल्ड हेल्थला (आरसीपीसीएच) डॉक्टरांसाठी दिशानिर्देश जारी करावे लागले.

मुलांच्या प्रकृतीत थोडा जरी बदल झाला तरी पालक ‘डॉ. गुगल’ म्हणजे गुगलवर लक्षणे शोधतात. लक्षणे तशी वाटली की ते तो आजार झाल्याचे मानतात आणि तसा गैरसमज बाळगतात. आरसीपीसीएचने हे जोखमीचे असल्याचे म्हटले असून, डॉक्टरांना सांगितले आहे की, ‘काल्पनिक किंवा अंदाजाच्या आधारे सांगितलेल्या आजाराऐवजी खऱ्या लक्षणांनुसारच उपचार करावेत, मुलांना तत्काळ कुठला धोका नसेल तर मुलांशी चर्चा करा. पालकांशीही वेगळे बोला.’ गेल्या दोन वर्षांत ही प्रवृत्ती वाढली आहे. ब्रिटनमध्ये ४००० कन्सल्टंट पेडिट्रिशियन आहेत आणि गेल्या २ वर्षांत प्रत्येक डॉक्टरकडे अशा केस आल्या आहेत. डॉक्टरांच्या मते, पालकांची चिंता योग्य आहे, पण ऑनलाइन मिळणाऱ्या चुकीच्या माहितीमुळेच असे प्रकार वाढत आहेत. बालसंरक्षणतज्ज्ञ डॉ. दान्या ग्लॅसर यांच्या मते, मुलांबाबत खरोखरच चिंता असेल तर पालकांना मुलांकडे लक्ष द्यावे लागेल आणि आपली चिंता विनाकारण नाही हे पाहावे लागेल. आरसीपीसीएचमधील सहायक प्राध्यापक डॉ. अॅमिलिया वावर्जविक म्हणाल्या, ‘ब्रिटनमध्ये २१६ पेडिट्रिशियनकडे असा सर्व्हे करण्यात आला असून आम्ही अशा प्रकाराचा सामना करत असल्याचे ९२% नी सांगितले आहे.’ कन्सल्टंट पेडिट्रिशियन डॉ. अॅलिसन स्टिली म्हणाल्या, ‘सोशल मीडियावर अप्रमाणित स्रोतांच्या लेखांमुळे ही स्थिती उद्भवली आहे.’

मुलांचे मुंडण करून घेतात पालक, आजारी आहोत असे मुलेही मानत आहेत
स्थिती अशी आहे की, अनेक पालक मुलांना शाळेतून काढत आहेत, अनावश्यक चाचण्या करून घेत आहेत. किमोथेरपी सुरू आहे असे वाटावे यासाठी त्यांचे मुंडण करून घेत आहेत. एका डॉक्टरने नकार दिल्यास ते दुसऱ्याकडे जातात. मुलांना वेगळे ठेवतात. त्यामुळे आपण आजारी असल्याचे मुलांनाही वाटते.ब्रिटनमध्ये मुलांचे डॉक्टर खूप त्रस्त आहेत. मुलांमध्ये विविध प्रकारच्या आजारांची लक्षणे असल्याचे सांगत पालक त्यांना डॉक्टरकडे आणत आहेत. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर कुठलाही आजार आढळत नाही. मुलाला आजार आहे हे डॉक्टरांना सांगण्याचा प्रयत्न पालक करतात. अनेकदा ते त्यात यशस्वीही होतात. असे प्रकार वारंवार होत आहेत. त्यामुळे रॉयल कॉलेज ऑफ पीडियाट्रिक्स अँड चाइल्ड हेल्थला (आरसीपीसीएच) डॉक्टरांसाठी दिशानिर्देश जारी करावे लागले.

मुलांच्या प्रकृतीत थोडा जरी बदल झाला तरी पालक ‘डॉ. गुगल’ म्हणजे गुगलवर लक्षणे शोधतात. लक्षणे तशी वाटली की ते तो आजार झाल्याचे मानतात आणि तसा गैरसमज बाळगतात. आरसीपीसीएचने हे जोखमीचे असल्याचे म्हटले असून, डॉक्टरांना सांगितले आहे की, ‘काल्पनिक किंवा अंदाजाच्या आधारे सांगितलेल्या आजाराऐवजी खऱ्या लक्षणांनुसारच उपचार करावेत, मुलांना तत्काळ कुठला धोका नसेल तर मुलांशी चर्चा करा. पालकांशीही वेगळे बोला.’ गेल्या दोन वर्षांत ही प्रवृत्ती वाढली आहे. ब्रिटनमध्ये ४००० कन्सल्टंट पेडिट्रिशियन आहेत आणि गेल्या २ वर्षांत प्रत्येक डॉक्टरकडे अशा केस आल्या आहेत. डॉक्टरांच्या मते, पालकांची चिंता योग्य आहे, पण ऑनलाइन मिळणाऱ्या चुकीच्या माहितीमुळेच असे प्रकार वाढत आहेत. बालसंरक्षणतज्ज्ञ डॉ. दान्या ग्लॅसर यांच्या मते, मुलांबाबत खरोखरच चिंता असेल तर पालकांना मुलांकडे लक्ष द्यावे लागेल आणि आपली चिंता विनाकारण नाही हे पाहावे लागेल. आरसीपीसीएचमधील सहायक प्राध्यापक डॉ. अॅमिलिया वावर्जविक म्हणाल्या, ‘ब्रिटनमध्ये २१६ पेडिट्रिशियनकडे असा सर्व्हे करण्यात आला असून आम्ही अशा प्रकाराचा सामना करत असल्याचे ९२% नी सांगितले आहे.’ कन्सल्टंट पेडिट्रिशियन डॉ. अॅलिसन स्टिली म्हणाल्या, ‘सोशल मीडियावर अप्रमाणित स्रोतांच्या लेखांमुळे ही स्थिती उद्भवली आहे.’

स्थिती अशी आहे की, अनेक पालक मुलांना शाळेतून काढत आहेत, अनावश्यक चाचण्या करून घेत आहेत. किमोथेरपी सुरू आहे असे वाटावे यासाठी त्यांचे मुंडण करून घेत आहेत. एका डॉक्टरने नकार दिल्यास ते दुसऱ्याकडे जातात. मुलांना वेगळे ठेवतात. त्यामुळे आपण आजारी असल्याचे मुलांनाही वाटते.

बातम्या आणखी आहेत...