आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

काठमांडू:वादग्रस्त विधानानंतर पीएम ओली नेपाळमध्ये थट्टेचा विषय... लोक म्हणाले, राम बीरगंजचे तर शरयू कुठे?

काठमांडू3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भट्टराय यांचा टोमणा, हे आदि कवी ओलींचे कलयुगातील रामायण

प्रभू श्रीराम आणि अयोध्येवरील वादग्रस्त विधानामुळे नेपाळचे पंतप्रधान के. पी. ओली शर्मा हे नेपाळमध्ये थट्टेचा विषय बनले आहेत. खरी अयोध्या नेपाळमधील बीरगंजजवळ असून तेथेच श्रीरामांचा जन्म झाल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यांच्या या विधानावर नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. 

नेपाळचे माजी पंतप्रधान बाबू राम भट्टराय उपरोधात्मक टोला लगावत म्हणाले, ‘आदि कवी ओलींचे कलियुगातील नवे रामायण ऐका, थेट वैकुंठधामच्या प्रवासाला निघा.’ माजी परराष्ट्रमंत्री रमेशनाथ पांडे म्हणाले, खरी अयोध्या बीरगंजजवळ आहे तर शरयू नदी कुठे आहे? धर्म राजकारणापेक्षा श्रेष्ठ आहे. हे विधान अत्यंत लाजिरवाणे आहे. तसेच ओलींना अशा प्रकारचे विधान करून भारत आणि नेपाळमधील संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न न करता ते आणखी बिघडवायचे आहेत, अशी टीका राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टीचे अध्यक्ष कमल थापा यांनी केली आहे. ओलींच्या विधानावर आश्चर्य व्यक्त करत त्रिभुवन विद्यापीठातील प्राध्यापक कुंदन आर्यल ट्विट करत म्हणाले, ओलींची भारतीय वाहिन्यांशी स्पर्धा आहे का? तर, ओलींच्या पक्षाचे नाव कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ आहे. कम्युनिझम म्हणजे साम्यवाद. जे देवाला मानत नाही. ओलींनी शपथ घेतानाही देवाचे नाव घेण्यास नकार दिल्याचे ज्येष्ठ पत्रकार धरुबा अधिकारी यांनी म्हटले आहे.

भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, ओलींची सारवासारव

नेपाळमधील नागरिकांनी पंतप्रधानांच्या विधानाची थट्टा उडवल्यानंतर तेथील परराष्ट्र मंत्रालयाला स्पष्टीकरण द्यावे लागले आहे. हे विधान कुठल्याही राजकीय मुद्द्याशी संबंधित नव्हते. तसेच कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नसल्याची सारवासारव मंत्रालयाकडून करण्यात आली आहे.