आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विध्वंस...:ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर लाव्हा घरात घुसला, भारतीयसैनिक लोकांना वाचवताहेत

किंशासा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर आकाश लालबुंद

आफ्रिकन देश कांगोच्या गोमा शहराजवळील निरागोंगो ज्वालामुखीचा १९ वर्षांनंतर उद्रेक झाला. त्यामुळे आकाश जणू लालबुंद झाले होते. १० किमीपर्यंत त्याची राख पसरली होती. ही राख महामार्ग व गोमा शहरातील असंख्य घरात घुसली. या भागात हल्लकल्लोळ पाहायला मिळत आहे.

हजारो लोक शेजारच्या रवांडाच्या दिशेने पळत होते. सुमारे तीन हजार लोक सीमा आेलांडून देशात आल्याचे रवांडा प्रशासनाने म्हटले आहे. कांगोमध्ये संयुक्त राष्ट्र मिशनमध्ये भारतीय सैनिक सक्रिय असून त्यांनी हजारो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले. यापूर्वी २००२ मध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. तेव्हा २५० जणांचा मृत्यू झाला होता. सुमारे १.२० लाख लोकांना पलायन करावे लागले होते. निधीचा तुटवडा असल्याने संशोधकांना नियमित निगराणी करता आली नाही. त्यामुळे संकटाचा अंदाज आला नाही.

बातम्या आणखी आहेत...