आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना जगभरात:तिसऱ्या लाटेनंतर अमेरिकेत आता दैनंदिन रुग्णसंख्येत झाली घट, नवे रुग्ण पाच लाखांहून कमी

न्यूयॉर्क2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना महामारीचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकेतून एक दिलासा देणारे वृत्त आहे. अलीकडेच तिसऱ्या लाटेनंतर आता देशातील दैनंदिन रुग्णसंख्येत घट झाली आहे. २० नोव्हेंबरला अमेरिकेत हा तिसरा मोठा फटका होता. त्या दिवशी २ लाख ४ हजार १६६ रुग्ण समोर आले होते. तेव्हापासून केवळ एक दिवस १.८० लाखांहून जास्त रुग्ण आढळले होते. सोमवारी १ लाख ६१ हजार ७३६ रुग्णसंख्या आढळली. दररोज होणाऱ्या मृत्यूंतही घट झाली आहे. २५ नोव्हेंबरला अमेरिकेत कोरोनामुळे २ हजार ३३२ जणांचा मृत्यू झाला होता. ३० नोव्हेंबरला १ हजार २३८ जणांचा मृत्यू झाला. एकीकडे दररोजच्या रुग्णसंख्येत घट होत आहे. दुसरीकडे सोमवारी रुग्णालयात दाखल रुग्णसंख्या वाढून ९६ हजार ३९ झाली आहे. थँक्स गिव्हिंग डेमुळे लोक मोठ्या संख्येने अमेरिकेतील एका शहरातून दुसऱ्या शहरात गेले. त्यामुळे बाधितांची संख्या पुन्हा वेगाने वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. आता उत्सवाचे दिवस सुरू होत आहेत. म्हणूनच चौथी लाट येईल, अशीही तज्ज्ञांना भीती वाटू लागलीये. २१ दिवसांनंतर जगभरात पाच लाखांहून कमी रुग्ण आढळले होते.

युरोपात नोकरी मिळेल, अफवेने ५०० मृत्युमुखी
कोरोना महामारीने आफ्रिकेचे थेट नुकसान झाले नसले तरी यासंबंधीची चुकीची माहिती मात्र संकटाला आमंत्रण देणारी ठरली आहे. कोरोनामुळे युरोपात नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे, अशी चुकीची माहिती पश्चिम आफ्रिकेतील देशांत पसरली.त्यामुळे बेकायदा मार्गे युरोपला जाण्याचा प्रयत्न करत आहेत. समुद्रमार्गे जाणाऱ्या ५२९ जणांचा प्राण गमवावे लागल्याचे वृत्त आहे.

बचाव कार्यासाठी २.५ लाख कोटी रुपये गरजेचे
२०२१ मध्ये कोरोनातील बचाव कार्यासाठी ३,५०० कोटी डॉलर (सुमारे २.५ लाख कोटी रुपये) एवढ्या निधीची गरज भासणार आहे, अशी माहिती संयुक्त राष्ट्राच्या आणीबाणी बचाव कार्याचे संयोजन मार्क लॉकुक यांनी दिली. ते म्हणाले, १६ कोटी लोकांपर्यंत मदत पोहोचवायची आहे.

चीनने किम जाँग उनला दिली आपली लस
चीनने उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग उन व त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांना आपली कोरोना लस दिली आहे. जपानच्या गुप्तचर विभागातील सूत्रांच्या हवाल्याने अमेरिकी विश्लेषकांनी हा दावा केला आहे. सेंटर फॉर द नॅशनल इंटरेस्टच्या उत्तर कोरियाचे तज्ज्ञ हॅरी काजियानिस म्हणाले, किम यांच्यासोबत उत्तर कोरियातील अनेक अधिकाऱ्यांनी ही लस घेतली आहे. हॅरी यांच्या म्हणण्यानुसार कोरियाला चीनने आपल्या प्रायोगिक पातळीवरील लसींपैकी एक लस दिली आहे. नेमकी कोणती लस देण्यात आली? ही लस किती सुरक्षित आहे? याची माहिती समजू शकली नाही. वैद्यकीय संशोधक पीटर जे हॉटेज म्हणाले, चीनमधील तीन कंपन्या कोरोना विषाणूवर काम करत आहेत. त्यात सायनोवॅक, कॅनसायनोबायो व सायनोफार्म ग्रुप सहभागी आहेत.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser