आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अमेरिकेत हवाई येथील किलुआ ज्वालामुखीचा उशिरा रात्री उद्रेक झाला. त्यामुळे सुमारे २०० फूट उंच लाव्हा उसळला. सोबतच त्याची राख ३ किमीपर्यंत पसरली. अमेरिकेच्या भूगर्भीय पाहणीनुसार ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर भूकंपाचा धक्काही बसला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ४.४ नोंदवण्यात आली होती. सोबतच परिसरातील भागात घरांना तडे गेले आहेत. दुसरीकडे ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर या भागात विषारी द्रवाची गळती होत आहे. त्यावरून प्रशासनाने लोकांना घरात राहण्याचा सल्ला दिला आहे. त्याचबरोबर ज्वालामुखीच्या जवळपास जाऊ नये, असा इशारा देण्यात आला असला तरी लोक मोठ्या संख्येने तेथे जात आहेत.
२०१८ ला ३० हजार फूट उसळला
याआधी किलुआ ज्वालामुखीचा मे २०१८ मध्ये उद्रेक झाला होता. यादरम्यान ३० हजार फुटांहून जास्त उंचीपर्यंत लाव्हा उसळला. त्यामुळे ५५० घरांचे नुकसान झाले होते. २००० हून जास्त लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.