आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • International
 • After The Withdrawal Of US Forces, China, Russia And Pakistan Are The Most Threatened By The Taliban

भास्कर INSIGHT:अमेरिकन सैन्य परतल्याने अफगाणिस्तानचा चीन, पाकिस्तान, रशियालाच जास्त धाेका, ..म्हणूनच तिन्ही देशांचा तालिबानच्या पाठिंब्यासाठी उतावीळपणा वाढलाय

2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

अफगाणिस्तानात अमेरिकेच्या एका निर्णयामुळे आशियातील राजकीय क्षेत्रात उलथापालथ झाली. प्रत्येक देशाला आपली सीमा आणि आपल्या रणनीतीच्या भागीदारीबद्दल चिंता वाटू लागली आहे. अफगाणिस्तानवर तालिबानचे वर्चस्व आहे. याचा स्पष्ट अर्थ दीर्घ संघर्ष हाेय किंवा एेतिहासिक भूराजकीय प्रतिमेला बदलणे हाेय. चीन, रशिया व पाकिस्तानने तालिबानला पाठिंबा दिला आहे. परंतु या भाैगाेलिक क्षेत्राला जाणून घेतल्यास तालिबान वाढण्याचा सर्वाधिक धाेका याच तीन देशांसाठी जास्त असल्याचे दिसून येते. कदाचित त्यामुळेच तिन्ही देश तालिबानशी संबंध वाढवण्यासाठी जास्त उतावीळ झाल्याचे दिसून येते. या परिस्थितीत काेणत्या देशासाठी लाभाच्या किती शक्यता आहेत, किती धाेके, याबद्दल भास्कर एक्स्पर्टचे विचार जाणून घेऊ.

रशिया : मध्य आशियात चीनचा हस्तक्षेप वाढल्याने पुतीन चिंतेत
रशियासाठी लाभापेक्षा हानी जास्त आहे. रशियासाठी एकमेव भावनात्मक लाभ दिसताे. १९८० च्या अखेरीस अफगाणिस्तानातून पराभूत हाेऊन रशियाला बाहेर पडावे लागले हाेते. त्याच पद्धतीने अमेरिकेलाही हार मानून बाहेर पडावे लागले. रशियाला शीतयुद्धाच्या सुडाचे स्वप्न पूर्ण झाल्याचे समाधान असावे.
हानी : रशिया ऐतिहासिक पातळीवर स्वत:ला जगातील एक सुपर पाॅवर मानत आला आहे. आज रशियाची प्रतिमा चीनच्या पाठी राहण्याची झाली आहे. ही प्रतिमा रशियाला मान्य नाही.

 • अमेरिका बाहेर पडताच चीनचा अफगाणिस्तानच्या आडून तुर्कमेनिस्तान, उझ्बेकिस्तान, ताजिकिस्तान, कझाकिस्तानसह एकूण मध्य आशियातील देशांत हस्तक्षेप वाढेल. रशियासाठी हे देश अंगणासारखे मानले जातात. हे देश पूर्वी साेव्हिएत संघाचा भाग हाेते.
 • चीनचा हस्तक्षेप या क्षेत्रात वाढल्यास रशियाला या भागातील आपले महत्त्व कमी हाेईल असे वाटते. त्याचबराेबर अफगाणिस्तानमधून अफीम, हेराॅइनची तस्करीदेखील अनेक पटींनी वाढेल. त्याचा फटका रशियाला कायदा-सुव्यवस्था गमावल्याच्या रूपाने बसू शकताे.

इराण : तालिबान किंवा आयसिल..दाेन्हीपासून शियाला धाेका
अफगाणिस्तानच्या हेरात प्रांताजवळ इराणची पूर्वेकडील सरहद्द आहे. अमेरिकेच्या तैनातीमुळे इराण आधी निश्चिंत हाेता. अमेरिकेने तालिबान, आयसिलवर नियंत्रण ठेवले हाेते. आता इराणसाठी दुहेरी संकट निर्माण झाले आहे.

 • तालिबानचे शासन आल्यास सीमेवर शिया समुदायासाठी असुरक्षा वाढेल, कारण तालिबान शियाच्या विराेधात आहे.
 • तालिबानचा साथीदार आयसिलने पाय पसरल्यास इराण, पाकिस्तानसह सीमेवरील देशांचा भाग एकत्र करून एक नवे इस्लामिक राष्ट्र स्थापन करण्याची कल्पना दिसून येते.

पाकिस्तान : पण सर्वाधिक नुकसान पाकिस्तानचेच

 • अमेरिका परतल्यानंतर पाकिस्तानला दहशतवादाच्या विराेधात लढण्यासाठी पश्चिमेकडील देशांकडून मिळणारी आर्थिक मदत सुरूच राहण्याची शक्यता कमी आहे.
 • आजही पाकची िनर्यात पश्चिमेकडील देशांना हाेते. चीनला नाही. चीनचे कर्ज केवळ पाकला मिळते. अशा परिस्थितीत पश्चिमेकडील देशांशी संबंध ठेवण्यासाठी तालिबानला नियंत्रित करून धार्मिक अतिरेकी कारवायांच्या सीमा निश्चित केल्या जाऊ शकतात.
 • जग देखील तालिबानला पाकिस्तानचे सब्सिडियरी मानते. परंतु तालिबानला नियंत्रणात ठेवता येणार नाही, असे पाकिस्तानला वाटते.
 • तालिबानने थेट रशिया, चीन व भारताशी संबंध निर्माण केल्यास त्यास पाकिस्तानची गरज राहणार नाही.
 • तालिबानने डुरंड लाइनचा मुद्दा मांडून सीमा वाद छेडल्यास पाकिस्तानची पश्चिमेकडील सीमाही अस्थिर हाेऊ शकते.

साैदी अरेबिया : आता कट्टरवाद नकाेय, म्हणूनच तालिबानवर माैन

 • प्रिन्स सलमानच्या नेतृत्वाखाली साैदीने कट्टर इस्लामिक शासन स्थापन करणे टाळले आहे. पाकिस्तानच्या आग्रहाखातर २० वर्षांपूर्वी साैदी धर्मासाठी निधी देत आले हाेते. परंतु आता साैदी त्यासाठी उत्सुक नाही. उलट अमेरिकेच्या मदतीने इस्रायलशी संबंध सुधारण्यावर भर देत आहे. येमेनमध्येही इराणशी लढणे टाळत आहे.
 • त्यासाठी रशियासाेबत तेलाच्या भावासंबंधी भागीदारी विकसित करणे गरजेचे आहे. ही बाब अमेरिकेच्या मदतीविना अशक्य आहे. अमेरिका याद्वारे रशियाला आपल्या गटात घेण्याचा प्रयत्न करेल.

भारत : तालिबान माेठे आव्हान.. अनेक संधीही
भारतासाठी नव्या संधी व आव्हाने आहेत. एकीकडे भारत, रशिया व इराणला अमेरिकेजवळ आणू शकताे. तिबेटच्या मुद्द्यावर जाेर लावून आणि तैवानला मदत करून चीनच्या अडचणींत वाढ देखील करू शकताे. ते करण्यासाठी भारताला क्वाॅडमधील सहभाग वाढवावा लागेल. अमेरिकेचे निर्बंध असूनही इराणकडून तेल खरेदीस सुरुवात करावी लागेल. अफगाणिस्तानातील जनतेच्या सुरक्षा व दहशतवादाच्या मुद्द्याला आंतरराष्ट्रीय मंचावर जाेरकसपणे मांडावे लागणार आहे.

चीन : जिनपिंग यांची सर्वात माेठी चिंता...शिनजियांगमध्ये तालिबानने दडून राहू नये
पश्चिमेकडील सीमेवर वाढणाऱ्या दहशतवादामुळे चीन चिंतेत आहे. त्यातूनच तालिबानला आपल्या गटात सामील करण्यासाठी चीन उतावीळ झाला आहे. या संकटाचे संधीत रूपांतर करण्याचा चीनचा प्रयत्न आहे.

तालिबानने भारताशी हात मिळवला तरी चीनचे नुकसान
चीनने मुस्लिमबहुल शिनजियांग प्रांतात जनतेवर अमानुष अत्याचार केले. जगभर मुस्लिमांसाठी लढत असल्याचे दाखवणाऱ्या पाकनेदेखील चीनच्या मुस्लिमांकडे पाठ फिरवली. तालिबान व त्याचे समर्थक गट चीनमधील मुस्लिमाच्या बाजूने दहशतवादी कारवाया वाढवू शकतात, अशी भीती चीनला वाटते. सत्तेवर आल्यानंतर तालिबान पाकिस्तानच्या नियंत्रणाबाहेर जाऊन भारत व अमेरिकेशी हातमिळवणी करू शकताे, अशी भीतीदेखील चीनला वाटते.

लाभ : अमेरिकेच्या तुलनेत स्वत:ला बळकट सिद्ध करू शकेल, अफगाणची खनिज संपत्तीही मिळेल.

 • अमेरिका कमकुवत हाेत असल्याचे सिद्ध हाेत असल्याचे चीनला पसंत. अमेरिका गरज पडल्यावर जपान, तैवान, फिलिपाइन्स, व्हिएतनाम, आॅस्ट्रेलिया, भारतासारख्या देशांना साेडून जाऊ शकताे, असा संदेश देण्याचाही चीनचा प्रयत्न आहे.
 • अफगाणमधील सुमारे सव्वातीनशे लाख काेटी रुपयांच्या खाणींचा मार्ग खुला हाेताना चीनला दिसत आहे. त्याचबराेबर विविध प्रकल्पांतून मध्य आशियासह पूर्व युराेपात हळूहळू पाय पसरण्याची चीनला संधी दिसू लागली आहे.

अमेरिका : एका पावलाने रशिया, चीन, इराणसाठी संकटात भर

 • अमेरिकेला शेतकरी व जनतेला अफीम व्यवसायापासून वेगळे करण्यात अपयश आले. महामारीदरम्यान आर्थिक हानी हाेत असल्याचे दिसून आल्याने तालिबानशी लढता येईल. परंतु अफीमशी शक्य नाही, असे अमेरिकेला वाटते.
 • अफगाणिस्तानात राहिल्याने इराण, रशिया व चीन तणावमुक्त असल्याचे अमेरिकेला लक्षात आले आहे. सैन्य हटवल्याने अमेरिकेचा या क्षेत्रातील हस्तक्षेप कमी हाेणार नाही. केवळ खर्च कमी हाेईल. आपल्या काही शत्रूंना आपला हेका साेडून अमेरिकेच्या बाजूने यावे लागेल, अशी अमेरिकेला अपेक्षा वाटते.
 • अफगाणिस्तानातील हस्तक्षेप चीनसाठी नाइलाज ठरणार आहे. त्यामुळे दक्षिण चीन सागर, तैवानपासून चीनचे लक्ष दुसरीकडे जाईल. अमेरिकेसाठी हे लाभदायी ठरेल.

एक्स्पर्ट पॅनल (इयान ब्रेमर (जगातील सर्वात मोठा रिस्क असेसमेंट ग्रुप युरेशियाचे संस्थापक), टेरेसिटा शेफर (माजी अमेरिकी मुत्सद्दी ), वँडा फॅलबॉब ब्राऊन (ब्रुकिंग्स इन्स्टिट्यूशनच्या सीनियर फेलो), प्रोफेसर फैज जालांद (काबूल विद्यापीठात सीनियर फॅकल्टी), श्याम सरन (माजी परराष्ट्र सचिव )

बातम्या आणखी आहेत...