आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Agitation Against Monarchy And Government In Thailand; Water Strikes To Disperse Protesters, 500 Injured

बँकॉक:थायलंडमध्ये राजेशाही आणि सरकारविरोधात आंदोलन; निदर्शकांना पांगवण्यासाठी पाण्याचा मारा, 500 जखमी

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मागणी : सरकारवर टीका करणाऱ्यांना त्रास देऊ नये

थायलंडमध्ये राजेशाही आणि सरकारविरोधातील आंदोलने तीव्र झाली आहेत. लोकशाही समर्थकांकडून मागील चार महिन्यांपासून राजेशाहीच्या घटनेत सुधारण करण्याची मागणी होत आहे. राजेशाही आणि सरकारच्या विरोधात बोलण्याचे स्वांतत्र्य मिळावे, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. याच मागणीसाठी रविवारी रात्री सुमारे १० हजार आंदोलकांनी राजधानी बँकॉकमधील ग्रँड पॅलेसजवळ आंदोलन केले. त्यांनी सरकार आणि थायलंडच्या राजाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलन चिघळल्यानंतर आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी पाण्याचा मारा केला. पोलिसांच्या कारवाईत ५०० पेक्षा जास्त आंदोलक जखमी झाले आहेत. वृत्तानुसार, आंदोलकांना रोखण्यासाठी सरकारने बँकॉकमध्ये आणीबाणीची घोषणा केली आहे.

मागणी : सरकारवर टीका करणाऱ्यांना त्रास देऊ नये
थायलंडमध्ये मागील काही दिवसांपासून अनेक आंदोलने सुरू आहेत. मात्र १४ ऑक्टोबरला विद्यार्थी आंदोलनाच्या वर्षपूर्तीनंतर हे आंदोलन अधिक तीव्र झाले. ज्यात १९७३ मध्ये लष्करी हुकूमशहाला सत्तेवरून हटवण्यात आले होते. आंदोलनात युवकांचा मोठा सहभाग आहे. सरकारवर टीका करणाऱ्यांना त्रास देऊ नये, अशी युवकांची मागणी आहे.

बातम्या आणखी आहेत...