आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदिया मुस्लिमांवर पुन्हा हल्ल्याचा कट:बांगलादेशमध्‍ये अहमदिया मशीद, 190 घरे, 50 दुकाने पेटवली; दोघांचा मृत्यू

ढाका20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बांगलादेशात सार्वत्रिक निवडणुकांना एक वर्षापेक्षाही कमी काळ बाकी आहे. अशा वेळी अल्पसंख्याकांवर हल्ल्याच्या घटना वाढत आहेत. उत्तर बांगलादेशातील पंचगड जिल्ह्यात अल्पसंख्याक अहमदिया समुदायाविरुद्ध कट्टरवादी मुस्लिम संघटनांच्या हल्ल्यात दोन युवकांचा मृत्यू झाला, तर १०० हून अधिक लोक जखमी झाले. मृतातील एका युवकाचे नाव जाहिद हसन (२३) आहे. कट्टरवाद्यांनी अहमदिया मशिदीसह याच समुदायाची १९० घरे व ५० दुकाने पेटवली. आंतरराष्ट्रीय मानवी हक्क समितीने (आयएचआरसी) अलर्ट जारी करत कट्टरवाद्यांनी शुक्रवारी अहमदिया बहुल नसिराबाद, कफुरिया, इस्लामगंजमध्ये मोठ्या हल्ल्यांचा कट रचल्याचा दावा केला.

जलशाला विरोध : अहमदिया समुदायाच्या वार्षिक जलशाला मुस्लिम कट्टरवादी विरोध होता. पंचगडमध्ये जलशाच्या मैदानावर हल्ला करत समुदायातील युवक जाहिदची हत्या केली.

नमाजनंतर मशीदीत जमाव : अहमदिया समुदायाला बिगर-मुस्लिम म्हणत इस्लामी कट्टरवादी त्यांचा वार्षिक जलसा रोखण्याच्या धमक्या देत होते. पंचगडमध्ये हल्ल्यापूर्वी हे लोक दुपारच्या नमाजनंतर मशीदीबाहेर गोळा झाले. धार्मिक घोषणा देत कट्टरवादी पंचगड शहरातील चौरंगी चौकात आले. येथे अहमदिया समुदायाच्या लोकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, पण कट्टरवाद्यांनी जाळपोळ व लूटमार केली. जलसा रद्द केला.

येथे हिंदूंनाही केले लक्ष्य, गेल्या ८ वर्षांत ३६०० हल्ले, ११ बळी
हिंदू, ख्रिश्चन, बौद्ध समितीच्या (बीएचबीसीयूसी) अहवालानुसार, बांगलादेशात २०१३ ते २०२१ दरम्यान हिंदूंवरील हल्ल्याच्या ३६०० पेक्षा अधिक घटना घडल्या. समितीचे महासचिव राणा दासगुप्ता यांच्या मते, गेल्या दाेन दशकांतील हल्ल्यांमध्ये ११ हिंदूंचा मृत्यू झाला. तर ८६२ जखमी झाले. हिंदू मंदिरांवरील हल्ल्याच्या १६७० घटनादेखील घडल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...