आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वप्नरंजन:AI आर्टिस्टने स्वतःच्या कल्पनाशक्तीने जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींना दाखवले गरीब; पाहा अंबानींचा विपन्नावस्थेतील PHOTO

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या आर्टिफिशिअल इंटेलिजेन्सशी संबंधित अनेक फोटो सोशल मीडियावर फारच व्हायरल होत आहेत. ते फोटो पाहून लोकही थक्क होत आहेत. एका एआय आर्टिस्टने जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींचे विपन्नावस्थेतील फोटो शेअर केलेत. त्याचे हे फोटोही इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरलेत.

गेट्स, अंबानी, बफेट गरीब

या AI फोटोंमधील एक छायाचित्र अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष व अब्जाधीश डोनाल्ड ट्रम्प यांचे आहे. या फोटोत ट्रम्प पांढरी बनियन घालून एका झोपडीपुढे उभे असल्याचे दिसून येत आहे. यात त्यांचे केसही अस्ताव्यस्त दिसून येत आहेत. उद्योगपती मुकेश अंबानी यांचाही एक साध्या कपड्यातील फोटो दाखवण्यात आला आहे. तर बिल गेट्स उघड्या बोडक्या अंगाने दिसून येत आहेत. वॉरेन बफेट व मार्क झुकरबर्ग यांचाही गरीब स्थितीतील एक वेगळा अंदाज या फोटोमध्ये पहावयास मिळत आहे. थोडक्यात जगातील सर्वच श्रीमंत व्यक्तींना या आर्टिस्टने एका गरीब व्यक्तीच्या भूमिकेत दाखवले आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर ही पोस्ट withgokul नामक अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. गत 2 दिवसांत या फोटोंना 10 हजारांहून अधिक लाइक्स मिळालेत. या फोटांवर यूझर्स वेगवेगळ्या कमेंट्सही करत आहेत. या फोटोंना पुढील कॅप्शन देण्यात आले आहे,'स्लमडॉग मिलिनेअर (या यादीत समाविष्ट करण्याचे कुणी राहिले काय?) '

पाहा श्रीमंतांचे विपन्नावस्थेतील फोटो...

डोनाल्ड ट्रम्प.
डोनाल्ड ट्रम्प.
बिल गेट्स.
बिल गेट्स.
मुकेश अंबानी.
मुकेश अंबानी.
मार्क झुकरबर्ग.
मार्क झुकरबर्ग.
वॉरेन बफेट.
वॉरेन बफेट.
जेफ बेझोस.
जेफ बेझोस.
एलन मस्क.
एलन मस्क.