आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातुम्ही दिवसातून किती वेळा खोकता? घरात किंवा बाहेर किती जास्त खोकता. याबाबत तुमची स्मरणशक्ती अचूक असू शकत नाही. मात्र, एआयच्या(आर्टिफिशियल इंटेलिजन्स) मदतीने तुमच्या खोकण्याच्या प्रत्येक पॅटर्नचे रेकाॅर्ड ठेवले जाऊ शकते.
याच्या माध्यमातून खोकल्याचा पॅटर्न आगामी काळात होणाऱ्या आजाराची शक्यता सांगू शकतो. खोकला अस्थमा, गॅस्ट्रोएसोफेजियल रिफ्लक्स रोग किंवा फुफ्फुसाच्या कर्करोगासारख्या स्थितीचेही लक्षण असू शकते. हायफे एआयचे मुख्य आरोग्य अधिकारी पीटर स्मॉल म्हणाले, ही एक अशी कंपनी आहे, जिच्याकडे जगभरात ७० कोटींपेक्षा जास्त खोकल्याच्या नमुन्यांचा डेटाबेस आहे. कफची डिजिटल देखरेख जास्त झाल्यास ही सीओपीडी, अस्थमा किंवा अॅलर्जीमुळे होणारे गंभीर आजार रोखण्यात मदत करू शकते. त्यासाठी महागड्या आणि जास्त उपचाराची गरज असते. आगामी काही वर्षांत कफ पॅटर्नमध्ये होणारा बदल कळाल्याने प्रत्येकाला आरोग्याबाबत जागरुक होण्यात मदत मिळू शकते. याशिवाय पॅटर्नच्या आधारावर अल्गोरिदम बनवून होणाऱ्या संसर्गाचा पूर्वानुमानही लावू शकतो. यात संवेदनशीलतेसोबत ९५ टक्के टीबी वा निमोनियासारख्या आजाराचा आधीच अंदाज बांधला जाण्याची शक्यता आहे.
स्मार्टफोनने खोकला ट्रॅक करण्यात मिळेल मदत एआय कंपनीचे व्यवस्थापक जेमी रोजर्स म्हणाले, स्मार्टफोन प्रत्येक जण स्वत:जवळ बाळगतो. त्याचा उपयोग आपल्या खोकल्यावर लक्ष ठेवण्याच्या कामात एक मोठा बदल करू शकतो. रेकॉर्डिंगला शक्तिशाली अल्गोरिदममध्ये बदल करून याचा लाभ घेऊ शकता.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.