आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:माॅलमध्ये प्रत्येकावर एआयने सज्ज कॅमेऱ्याची नजर; भुरट्या चोरांना पाहताच अधिकाऱ्यांना सतर्क करेल

लंडन16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ब्रिटनच्या स्टोअरमध्ये शॉपलिफ्टिंगचा ट्रेंड; नॅपी, ब्लेड, डिओडोरेंटची जास्त चोरी
  • दरवर्षी ३ लाख घटना, १८ महिन्यांत ३००० पेक्षा जास्त चोऱ्या रोखल्या

जर तुम्हाला शॉपिंग मॉल वा सुपर बाजारातून लपून छपून वस्तू उचलण्याची सवय असेल तर सावध व्हा. इंग्लंडच्या सुपर बाजार आणि शॉपिंग मॉलमध्ये आता आर्टिफिशियल इन्टेलिजन्सने (एआय) सज्ज फेशियल रिकग्निशन तंत्राच्या कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवून अशा लोकांची ओळख पटवली जात आहे.

इंग्लंडमध्ये फेशियल रिकग्निशन तंत्राशी संबंधित स्टार्टअप फेसवॉचने अशा लोकांवर नजर ठेवून शोध लावला की, लोक सर्वाधिक नॅपीज, रेझर ब्लेड, डिओडोरेंटसारख्या वस्तू आपल्या खिशात ठेवतात. कंपनीने आता अशी सवय असलेल्या लोकांची ‘वॉचलिस्ट’तयार करून ती स्टोअर व शॉपिंग मॉलना उपलब्ध केली आहे. विशेष म्हणजे संबंधित व्यक्ती शॉपिंग मॉल वा सुपर बाजारात प्रवेश करताच किंवा सीसीटीव्हीत दिसताच एआय आधारित फेशियल रिकग्निशन तंत्रज्ञान स्टोअर कर्मचाऱ्यांना मोबाइल अॅपवर अलर्ट पाठवेल की, वस्तू चोरणारी व्यक्ती आली आहे.

या तंत्राद्वारे अशा लोकांना तोंड देण्यासाठी कर्मचाऱ्यांना पुरेसा वेळ मिळत आहे. काय करायचे याचा सहज निर्णय घेतला जात आहे. आधी सन्मानाने समजावले जाते की स्टोअरच्या बाहेर जा. न ऐकल्यास पोलिस बोलावण्याची कारवाईदेखील केली जाते. अनेकदा लोक अशा वेळी कर्मचाऱ्यांवर हल्ला करतात. एका सहकारी दुकानाच्या प्रवक्त्यानुसार शॉपलिफ्टिंगशी संबंधित प्रकरणात मागील वर्षात हिंसा ८०% वाढली आहे. यामुळे विनंती न ऐकल्यास पोलिसांना बोलावले जाते. फेसवॉचने या तंत्राने सज्ज कॅमेरे इंग्लंडच्या दक्षिण भागातील सर्व १८ सहकारी दुकाने, पेट्रोल पंपमध्ये बसवले आहेत.

इंग्लंडमध्ये दरवर्षी शॉपलिफ्टिंगचे ३.४० लाखांपेक्षा जास्त घटना समोर येतात. या आधुनिक तंत्राने १८ महिन्यात शॉपलिफ्टिंगच्या ३००० पेक्षा जास्त घटना रोखण्यात मदत झाली आहे. कोरोना महामारीच्या काळात फेशियल रिकग्निशन तंत्रात अाणखी एक अायाम जोडला गेला आहे. आता मास्क घातलेल्या लोकांनाही हे तंत्रज्ञान ओळखून घेते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser