आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तालिबानशी युद्ध:काबूलपासून केवळ 100 किमीवर तालिबानविरुद्ध ऐलान-ए-जंग, पंजशीर खाेऱ्यात 30 हजारांवर अफगाणींची वज्रमूठ

बजारक (पंजशीर खोरे)2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अफगाणिस्तानवर तालिबानी ताब्याला आठवडाही उलटत नाही तोच त्यांच्याविरुद्ध अनेक गट राजधानी काबूलपासून फक्त १०० किमीवरील पंजशीर खोऱ्यात एकवटत आहेत. शुक्रवारी येथे अफगाणी सैनिकांच्या अनेक तुकड्या धडकल्या अन् त्यांनी तालिबानविरुद्ध युद्धाची घोषणाही केली. ४ दिवसांत अफगाणी सैनिकांसह ३० हजारांवर तरुण तेथे जमले. तसेच पंजशीर खोऱ्यातील १०० पेक्षा जास्त टोळ्यांचे योद्धे आहेत. त्यांना एकत्र आणण्याची सुरुवात उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेह व संरक्षणमंत्री बिस्मिल्लाह खान मोहंमदींनी १६ ऑगस्टलाच केली होती. तालिबानविरुद्ध युद्धाची धुरा ३२ वर्षांच्या अहमद मसूदकडे सोपवली आहे. अहमद हे माजी संरक्षणमंत्री आणि तालिबानला राेखण्यासाठी स्थापन नॉर्दर्न अलायन्सचे माजी प्रमुख अहमद शाह मसूदचे पुत्र आहेत.

तालिबानला एकदाही पंजशीर खोरे फत्ते करता आलेले नाही. देशाच्या ३४ प्रांतांपैकी एकमेव पंजशीरमध्ये तालिबान्यांना आजही घुसण्याची हिंमत होत नाही. येथे अहमद समर्थक गटांच्या सशस्त्र तुकड्या आहेत. मात्र संरक्षणतज्ज्ञांच्या मते, आता कोणत्याही क्षणी संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. तालिबानविरुद्ध युद्ध पुकाराल का, या प्रश्नावर अहमदने काबूल टाइम्सला सांगितले, ‘थोडी वाट पाहा. काेणत्याही स्थितीला तोंड देण्यासाठी आम्ही स्वत:ला सज्ज केले आहे. पंजशीरचे टोळी सरदार एक-एक करून आमच्यासोबत येत आहेत. आम्ही शेवटच्या श्वासापंर्यंत लढू.’ दुसरीकडे, संरक्षणमंत्री मोहंमदीसोबत आलेल्या लष्कराच्या तुकड्या तरुणांना प्रशिक्षित करत आहेत.

- एका दाव्यानुसार , अंद्राब व बघलानचे ३ जिल्हे तालिबानी ताब्यातून सोडवण्यात आले. जिल्हा मुख्यालयांवरून तालिबानी झेंडे हटवून अफगाणी झेंडे फडकवण्याचे व्हिडिओही जारी झाले आहेत. - दरम्यान, माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई पंजशीरमध्ये दाखल झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...