आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Air India Flight Update; Delhi News | Air India Flight Returns To Delhi IGI Airport After Bat Found In Plane

एअर इंडियाच्या विमानात वटवाघुळ:अमेरिकेला जाणाऱ्या विमानातील बिझनेस क्लासमध्ये दिसले वटवाघुळ, दिल्लीत करावी लागली इमरजंसी लँडिंग

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वाइल्ड लाइफ एक्सपर्टने वटवाघुळाला बाहेर काढले

दिल्लीवरुन अमेरिकेला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात वटवाघुळ आढळल्याची घटना घडली आहे. एअर इंडियाची फ्लाइट नंबर AI-105 ने शुक्रवारी पहाटे 2.20 वाजता दिल्लीवरुन अमेरिकेच्या नवार्क (न्यूजर्सी) साठी उड्डाण घेतली. टेक ऑफच्या 30 मिनीटानंतर विमानातील विझनेस क्लासमध्ये एक वटवाघुळ आढळले. यानंतर सकाळी 3.55 वाजता विमानाची इमरजंसी लँडिंग झाली. वन विभागाच्या पथकाने विमानातील वटवाघुळाला बाहेर काढले.

एअर इंडियाचे बोइंग 777-ER विमान दिल्ली-नवार्कसाठी वापरले जाते. एअर इंडियाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, 'DEL-EWR AI-105 फ्लाइटसाठी दिल्ली विमानतळावर लोकल स्टँडबाय इमरजंसी घोषित केली होती. विमानाची लँडिंग झाल्यानंतर कॅबिन क्रुने विमानात वटवाघुळ असल्याची माहिती दिली.'

वाइल्ड लाइफ एक्सपर्टने वटवाघुळाला बाहेर काढले

शुक्रवारी उड्डाण घेतल्याच्या अर्ध्या तासानंतर वैमानिकाने एअर ट्रॅफिक कंट्रोलला विमानात वटवाघुळ असल्याची माहिती दिली. यानंतर विमानाची इमरजंसी लँडिंग करण्यात आली. लँडिंगनंतर विमानतळाच्या कर्मचाऱ्यांना विमानात वटवाघुळ आढळले नाही. यानंतर बाद वाइल्ड लाइफ एक्सपर्ट्सला बोलवण्यात आले. त्यांनी विमानात फ्यूमिगेट (धुर) केला, यानंतर त्यांना मृतावस्थेत पडलेले वटवाघुळ आढळले.

बातम्या आणखी आहेत...