आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशियाचे हाल:व्हिएतनाममधील 30 भागांत हवेतून पसरणारा व्हेरिएंट, निर्बंध लागू; महामारीपासून दूर देशांत वाढली चिंता

हनोई22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पहिल्या लाटेत नियंत्रण मिळवल्यामुळे व्हिएतनामचे जगभर कौतुक झाले होते

कोरोनाच्या पहिल्या लाटेवर मात केल्यामुळे जगभर व्हिएतनामचे कौतुक झाले होते. चीनमधून सुरू झालेल्या संसर्गाचा शेजारी राष्ट्र असूनही व्हिएतनाममध्ये प्रादुर्भाव झाला नव्हता. परंतु आता या देशात विषाणूचे नवे प्रतिरूप आढळून आल्याने चिंता वाढली आहे. हे प्रतिरूप बी.१.६१७ शी मिळतेजुळते आहे. हा विषाणू हवेतून वेगाने पसरतो, असा दावा केला जातो. या व्हेरिएंटमुळे व्हिएतनाममध्ये एका आठवड्यात कोरोनाचे ६१ टक्के रुग्ण व मृत्यूची संख्या २० टक्क्याने वाढली आहे. व्हिएतनामचे आरोग्यमंत्री गुयेन थान लाँग म्हणाले, या प्रतिरूपे भारत व ब्रिटनमध्येही आढळून आली. कोरोनाचे हे प्रतिरूप घशात वेगाने पसरते.

कोरोनाचा नवा व्हेरिएंट ३० पेक्षा जास्त ठिकाणी पसरला आहे. त्यामुळेच येथे निर्बंध वाढले आहेत. काही ठिकाणी धार्मिक कार्यक्रमानंतर रुग्णसंख्येत वाढ दिसून आली. त्यानंतर अशा कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली. मोठ्या शहरांत गर्दी जमवल्याने निर्बंध आहेत. सार्वजनिक उद्याने, रेस्तराँ, बार,क्लब, व स्पा देखील बंद आहेत. व्हिएतनाममध्ये ६८०८ रुग्ण आढळले. २८२९ रुग्ण बरे झाले. ४७ लोकांचा मृत्यू झाला. ९.७ कोटींची लोकसंख्या असलेल्या व्हिएतनाममध्ये तूर्त एस्ट्राजेनेका-ऑक्सफर्डची लस दिली जात आहे. देशात आतापर्यंत १० लाख लोकांना लसीचा डोस देण्यात आला आहे.

सौदीने भारत वगळून ११ देशांवरील निर्बंध हटवले
सौदी अरेबियाने रविवारी सकाळी ११ देशांतील नागरिकांच्या प्रवासावरील बंदी हटवली आहे. त्यात यूएई, जर्मनी, अमेरिका, आयर्लंड, इटली, पोर्तुगाल, ब्रिटन, स्विडन, स्वित्झर्लंड, फ्रान्स, जपानचा समावेश आहे. या देशांतील नागरिकांना साैदीचा दौरा करण्यापूर्वी क्वाॅरंटाइन प्रक्रियेचे पालन करावे लागत. परंतु भारतासह ९ देशांतील नागरिकांवर हे निर्बंध अजूनही कायम ठेवण्यात आले आहेत.

१५ देशांत वाढले रुग्ण, भूतानची स्थिती धोकादायक
गेल्या एक आठवड्यात आशियातील १५ देशांत रुग्ण वाढले आहेत. अफगाणिस्तान, संयुक्त अरब अमिराती (यूएई), म्यानमार, भूतान व बांगलादेशातील स्थिती चिंताजनक आहे. अफगाणिस्तानात १२३ टक्के रुग्ण, म्यानमारमध्ये ७६ टक्के रुग्ण, भूतानमध्ये ८७ टक्के रुग्ण, कंबोडियात ४९ टक्के, मलेशियात ३८ टक्के रुग्ण, यूएईमध्ये ३३ टक्के. कुवेतमध्ये १४ टक्के, सौदी अरेबियात ११ टक्के रुग्ण वाढले आहेत.

ट्रॅव्हल बबलचा जल्लोष..
ट्रॅव्हल बबलचा जल्लोष..

ट्रॅव्हल बबलचा जल्लोष..
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन न्यूझीलंडला दाखल झाले. ट्रॅव्हल बबलचा आनंद त्यांनी न्यूझीलंडच्या पंतप्रधानांसह पारंपरिक माआेरी अभिवादनातून केला.

बातम्या आणखी आहेत...