आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युराेपसह जगभरात विमानतळांची स्थिती:काेराेनानंतर काेणत्याही याेजनेविना विमानसेवा

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विमानतळावर गैरव्यवस्था का? उत्तर अमेरिकेपासून युराेपातील सर्व विमानतळांवर गैरव्यवस्था आहे. प्रवाशांची माेठी गर्दी दिसते. परंतु त्यांची व्यवस्था करण्यात विमानतळ सक्षम दिसत नाहीत. अशा तक्रारींमागे कर्मचाऱ्यांची कमतरता हे कारण सांगितले जाते. वैमानिक म्हणाले, उशिरापर्यंत उड्डाण हाेत असल्याने थकवा जाणवत आहे. एअरलाइन संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे. काेराेनानंतर प्रवासी माेठ्या संख्येने बाहेर पडले आहेत. उड्डाणे पूर्ण क्षमतेने हाेत आहेत. परंतु कंपन्यांनी त्यासाठी आवश्यक तयारी केलेली नाही. हटवलेला स्टाफ पूर्ववत झालेला नसल्याने गैरव्यवस्था दिसते.

उड्डाणे रद्द का हाेत आहेत? कर्मचाऱ्यांची कमतरतेसह याेजना नसल्याने प्रवासी व उड्डाणांचे व्यवस्थापन हाेताना दिसत नाही. एअरलाइन कंपन्या संधीचा फायदा घेण्यासाठी प्रवाशांना त्यांच्या नशिबावर साेडत आहेत. तिकीट बुकिंग केली जात आहे. परंतु विमानांची देखभाल नाही.

प्रवास एवढा त्रासदायक का वाटताे? युराेपातील इझीजेटच्या एका वैमानिकानुसार प्रवाशांच्या दृष्टिकाेनातून प्रवास त्रासदायक हाेत आहे. लाेक काेराेनानंतर स्वत:ला ताजेतवाने करण्यासाठी देश-विदेशात पर्यटनाला निघून जात आहेत. त्यांच्या प्रवासासाठी विमान कंपन्यांकडे याेग्य अशी याेजनादेखील नाही. त्यांना केवळ जास्तीत जास्त लाेकांना घेऊन उड्डाण करायचे आहे. काेराेना जणू आलाच नाही, असा व्यवहार ते करू लागले आहेत. वास्तविक त्यांनी कर्मचारी संख्येत घट केली आहे.

ग्राउंड स्टाफमुळेदेखील उड्डाणे रद्द ? हाे. काेराेनाकाळात क्रू मेंबरसाेबत ग्राउंड स्टाफलादेखील नाेकरी गमावावी लागली हाेती. या कर्मचाऱ्यांत सामानाची तपासणी करणारे, चेकइन, सुरक्षा रक्षक, ग्राउंड स्टाफलादेखील नाेकरी गमवावी लागली. त्यांच्या कमतरतेमुळे विमान सेवा काेलमडली आहे. कारण वेळेवर चेक इन, सामान हाताळणी-तपासणी हाेत नाही.

कर्मचारी नोकरीवर हजर का होत नाहीत? विमान कंपन्या त्यांना जुन्या पगारीवर ठेवू इच्छितात. वास्तविक महागाई प्रचंड वाढली आहे. कारण कर्मचारी वर्ग महागाईने वैतागला आहे. वैमानिकांना वर्षभरात ९०० तास उड्डाण करावे लागते. सध्या सरासरी १५०० तास झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...