आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हल्ला:म्यानमार लष्कराची जमावावर बॉम्बफेक, 100 जणांचा मृत्यू; 20 मिनिटे हवेत गोळीबार

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

म्यानमारच्या लष्कराने मंगळवारी 20 मिनिटे सतत विमानातून बॉम्बफेक आणि गोळीबार केला. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार या हल्ल्यात 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये डझनभर महिला आणि लहान मुलांचा सहभाग आहे.

पाजीगी शहरात हा हल्ला झाला हा भाग सांगेगी प्रांतात आहे. राजधानी नेपीडाव पासून ते 260 KM अंतरावर आहे. पाजीगी शहरात पीपल्स डिफेन्स फोर्सेस (पीडीएफ) चे कार्यालय उघडत असताना लष्कराने हा हल्ला केला. वास्तविक, पीडीएफ देशात लष्कराच्या विरोधात मोहीम चालवत आहे. हल्ल्याच्या वेळी तिथे 300 हून अधिक लोक उपस्थित होते.

संयुक्त राष्ट्र म्हणाले - हे धक्कादायक चित्र
संयुक्त राष्ट्राने लष्कराच्या हल्ल्याचा निषेध केला आहे. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार उच्चायुक्त वोल्कर तुर्क म्हणाले की, हवाई हल्ल्याचे वृत्त अस्वस्थ करणारे होते. ते म्हणाले की, हेलिकॉप्टरमधून बॉम्ब टाकले तेव्हा अनेक शाळकरी मुले एका हॉलमध्ये नृत्य करत होती.

प्रत्यक्षदर्शीने सांगितले- लष्कराने आधी बॉम्ब टाकला, नंतर गोळीबार केला
दोन वर्षांपूर्वी झालेल्या सत्तापालटानंतरचा हा सर्वात मोठा लष्करी हल्ला मानला जात आहे. हल्ल्यावेळी तिथे असलेल्या एका व्यक्तीने बीबीसीला सांगितले की, सकाळी 7 वाजता लष्कराचे एक विमान गावात आले. त्यांनी बॉम्ब हल्ला केला. त्यानंतर अनेक हेलिकॉप्टरमधून गोळीबार सुरू झाला. हा गोळीबार सलग 20 मिनिटे सुरू होता.

जवळपास राहणाऱ्या लोकांनी त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या व्हिडिओंमध्ये आजूबाजूला मृतदेह दिसून येत आहेत. तिथे उपस्थित लोकांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी मृतदेहाची मोजणी सुरू केली. परंतु मृतदेहांचे भाग वेगवेगळ्या ठिकाणी विखुरले गेल्याने त्यांना मृतदेह देखील मोजता येत नाही.

2022 मध्ये एकट्या हवाई हल्ल्यात 460 लोकांचा मृत्यू
'द गार्डियन'च्या वृत्तानुसार, म्यानमारमध्ये हवाई हल्ले ही रोजची गोष्ट बनत चालली आहे. सैन्य आपल्या विरोधकांवर हल्ला करण्यात कोणतीही कसर सोडत नाही. यामुळे ती सर्वसामान्यांना टार्गेट करत आहे. म्यानमार विटनेसच्या अहवालानुसार गेल्या 6 महिन्यांत अशा 135 घटना घडल्या आहेत.

1 फेब्रुवारी रोजी म्यानमारमध्ये सत्तापालट होऊन दोन वर्षे पूर्ण झाली. 2021 मध्ये लष्कराने तेथील निवडून आलेल्या आंग सान स्यू की यांचे सरकार पाडले होते आणि त्यांना तुरुंगात टाकले होते. तेव्हापासून लोक वेगवेगळ्या मार्गाने लष्कराच्या विरोधात निदर्शने करत आहेत. बीबीसीच्या म्हणण्यानुसार, जेव्हा सैन्य जमिनीवर विरोधकांच्या समोर कमकुवत होऊ लागले तेव्हा त्यांनी हवाई हल्ले करण्यास सुरुवात केली.

2 वर्षांत 31 हजारांहून अधिक लोकांचा झाला मृत्यू
म्यानमारच्या न्यूज वेबसाइट ईरावडीनुसार, दोन वर्षांत तेथे 31,022 लोकांनी आपला जीव गमावला आहे. त्यापैकी 2022 मध्ये झालेल्या हवाई हल्ल्यांमध्ये 460 लोक मारले गेले. हवाई हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये बहुतांश लहान मुले आहेत. यूएनच्या म्हणण्यानुसार, हवाई हल्ल्यांमुळे 1.1 दशलक्ष लोकांना घरे सोडावी लागली आहेत.

'द ईरावडी'च्या नुसार, 40 वर्षांनंतर गेल्या जुलैमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. सरकारने कार्यकर्ता जिमी, नॅशनल लीग फॉर डेमोक्रसीचे खासदार, फ्यो जेया थाव आणि इतर दोघांना फाशी दिली. एका अंदाजानुसार, म्यानमारच्या लष्कराने एका वर्षात सुमारे 100 जणांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.

चीन आणि रशियन लढाऊ विमानांकडून हल्ले
अलीकडेच, यूएनने आपल्या एका अहवालात उघड केले आहे की म्यानमार आपल्या लोकांना मारण्यासाठी वेगाने शस्त्रास्त्रांचा साठा वाढवत आहे. निर्बंधांमुळे म्यानमार इतर देशांकडून शस्त्रे खरेदी करू शकत नाही. यामुळे तो स्वतःची शस्त्रे बनवत आहे.
भारत, अमेरिका आणि जपानसह 13 देशांतील कंपन्या या कामात म्यानमारला मदत करत आहेत. त्याचवेळी, बीबीसीच्या अहवालात हे उघड झाले आहे की म्यानमार लोकांवर हवाई हल्ले करण्यासाठी जी विमाने वापरत आहे ती रशिया आणि चीनची आहेत.