आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतवंशीय अजय बंगांची वर्ल्ड बँकेच्या अध्यक्षपदी निवड:5 वर्षांचा असेल कार्यकाळ, बायडेन यांनी केले होते नॉमिनेट, पुण्यातला आहे जन्म

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय वंशांचे अजय बंगा यांची जागतिक बँकेचे नवे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. ते येत्या 2 जून रोजी पदभार स्वीकारतील. त्यांचा कार्यकाळ 5 वर्षांचा असेल.

बायडेन यांनी केले होते नॉमिनेट

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी बंगा यांना या पदासाठी नॉमिनेट केले होते. अजय बंगा यांनी जालंधर आणि शिमलामधून शिक्षण घेतले आहे. DU मधून पदवी आणि IIM अहमदाबादमधू MBA केले आहे. भारत सरकारने त्यांना 2016 मध्ये पद्मश्रीने सम्मानित केले आहे.

पुण्यात जन्म, पहिले भारतवंशीय अध्यक्ष ठरतील

अजय बंगा यांचा जन्म पुण्यात 10 नोव्हेंबर 1959 रोजी झाला होता. त्यांचे वडील हरभजन सिंह बंगा भारतीय सेनेत लेफ्टनंट जनरल होते. बंगा हे वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष बनणारे पहिले भारतवंशीय असतील. 63 वर्षीय बंगा हे प्रायव्हेट इक्विटी फंड जनरल अटलांटिकचे उपाध्यक्ष आहेत.

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी दोन महिन्यांपूर्वी बंगा यांच्या नावाची शिफारस केली होती. या पदासाठी शिफारस झालेले ते भारतीय वंशाचे ते पहिलेच व्यक्ती ठरले होते. जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास यांनी एप्रिल 2024 पूर्वी पायउतार होण्याची घोषणा केली होती. त्यानंतर बंगा यांची शिफारस करण्यात आली होती.

‘शक्तिशाली उद्योगपती’ म्हणून निवड

1981 मध्ये ते नेस्ले इंडियात मॅनेजमेंट ट्रेनी होते. 1996 मध्ये ते सिटी ग्रुपचे मार्केटिंग हेड झाले. 2000 मध्ये सिटी फायनान्शियलचे प्रमुख बनले. 2009 मध्ये मास्टरकार्डचे सीईओ झाले आणि मास्टरकार्ड तरुणांत लोकप्रिय केले. 2016 मध्ये ते पद्मश्रीने सन्मानित झाले. प्रसिद्ध नियतकालिक फॉर्च्युनने 2012 मध्ये त्यांची ‘शक्तिशाली उद्योगपती-2012’ म्हणून निवड केली. भारतात त्यांनी केएफसी आणि पिझ्झा हट आणले.

मास्टरकार्डला बनवले सर्वात मौल्यवान कंपनी

मास्टरकार्डच्या यशामागे भारतीय वंशाचे अजय बंगा हे आहेत. 2009 मध्ये जेव्हा ते मास्टरकार्डमध्ये सामील झाले तेव्हा त्यांच्यापुढे सर्वात मोठे आव्हान व्हिसाशी स्पर्धा करणे हे होते. अजय जुलै 2010 ते 31 डिसेंबर 2020 पर्यंत मास्टरकार्डचे सीईओ होते.

आपल्या कार्यकाळात, अजय यांनी मास्टरकार्डला सर्वात मौल्यवान कंपन्यांच्या यादीत 256 व्या स्थानावरून 21 व्या स्थानावर नेले. या काळात मास्टरकार्डच्या शेअरची किंमत 30 डॉलरवरून ते 350 डॉलरवर पोहोचले.

या व्यतिरिक्त कंपनीने या कालावधीत आपल्या भागधारकांना 1581 टक्के परतावा दिला. 2019 मध्ये, मास्टरकार्डने अजय बंगा यांच्या नेतृत्वात महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी यूएस सरकारच्या महिला विकास आणि समृद्धी संस्थेशी भागीदारी केली. भारत सरकारने 2016 मध्ये बंगा यांना पद्मश्री देऊन सन्मानित केले.

अजय बंगांविषयी या बातम्याही वाचा...

मास्टरकार्डचे माजी सीईओ अजय बंगा चर्चेत:मास्टरकार्डला 21वी मौल्यवान कंपनी बनवले, बायडेन यांनी वर्ल्ड बैंकेसाठी नॉमिनेट केले

जागतिक बँकेच्या अध्यक्षपद निवडणूक:भारतात केएफसी अन् पिझ्झा हट सुरू करणारे अजय बंगा जागतिक बँकेच्या अध्यक्षपद शर्यतीत