आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
थोर सुफी संत हजरत ख्वाजा मोईनुद्दीन हसन चिश्ती यांचा ९० वा उरूस मुबारक अजमेरमधील दर्ग्यात साजरा होत आहे. येथे दरराेेज १० हजार चादरी चढवल्या जातात. त्यानुसार १५ दिवसांत म्हणजे म्हणजे उरुसाचा ध्वज फडकल्यापासून ते ९ रजबपर्यंत म्हणजे ‘बडे कूल’च्या रिवाजापर्यंत जवळपास १.५ लाख चादरी चढवल्या जातात. ५० पासून ते ५० हजार रुपयांपर्यंत किमतीच्या या चादरींमुळे प्रत्यक्ष- अप्रत्यक्षरीत्या १५ हजार लाेकांचा उदरनिर्वाह हाेताे. यंदा येथे चार राष्ट्राध्यक्षांनी (भारत, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान) चादरी चढवल्या आहेत.
प्रथमच...अफगाणिस्तानकडूनही चादर
- पीएम मोदी यांच्या तवीने ७ वर्षांत ७ चादरी चढवण्यात आल्या आहेत. मात्र, ते एकदाही स्वत: चादर चढवायला आलेले नाहीत.
- माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, राजीव गांधी, पी. वी. नरसिंहा राव, इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळातही चादरी पाठवल्या जात.
- पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती झियाउल हक, जनरल परवेज मुशर्रफ, आसिफ अली झरदारी, बेनझीर भुत्तो यांनीही चादर चढवली आहे.
- बांगलादेशचे माजी राष्ट्रपती एच. एम. इर्शाद, सध्याच्या पंतप्रधान शेख हसीना, माजी पंतप्रधान खालिया झिया यांनीही चादर चढवली आहे.
- यावेळी पहिल्यांदाच अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गणी यांच्या वतीने उरुसा निमित्त चादर सादर करण्यात आली. {दरवर्षी सुमारे ५०० भाविक पाकिस्तानातून येतात.
परंपरा कायम... स्वातंत्र्याच्या आधीच्याही चादरी
-स्वातंत्र्यापूर्वीच्या अनेक चादरी दर्ग्याच्या गाभाऱ्यात सुरक्षित आहेत.
-खादीमांची संस्था अंजुमन सय्यद जादगानचे संघटनेचे सचिव सय्यद वहीद हुसेन अंगाराशाह अंजुमन सय्यद जादगन म्हणाले, याापैकी अनेक चादरी सोन्या-चांदीच्या तारांनी बनविल्या आहेत, त्या सुरक्षित ठेवल्या आहेत.
-आता गाभारा भरलेला आहे.
-बहुतेक चादरी ५० ते ५०० रुपयांपर्यंत आहेत.
-दर्ग्याच्या आसपास १०० पेक्षा जास्त चादरीची दुकाने आहेत.
-अशीही चर्चा आहे की, बऱ्याचशा चादरी कबरीवर चढवल्यानंतर पुन्हा दुकानात जातात.
-खादिम सय्यद वाहिद हुसेन म्हणतात, गरीब नवाजच्या कबरीवर चढवलेल्या चादरी देशभरातल्या अन्य कबरीसाठी पाठवल्या जातात. या चादरी चढवणे अभिमानास्पद असते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.