आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्नाटकातील हिजाब वादात अल कायदा या दहशतवादी संघटनेनेही उडी घेतली आहे. अल-कायदाचा म्होरक्या अल-जवाहिरीने व्हिडिओ जारी करून म्हटले आहे की, जगभरातील मुस्लिमांनी हिजाब परिधान करण्याच्या वादावर लढणाऱ्या मुलींना उघडपणे पाठिंबा द्यायला हवा.
डेली मेलच्या वेबसाइटवर असलेल्या या 9 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये जवाहिरीने म्हटले की – भारताच्या हिंदू लोकशाहीत मुस्लिमांवर अत्याचार होत आहेत. कर्नाटकातील हिजाबच्या वादातून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या मुस्कानला त्याने एक महान मुलगी म्हटले.
फ्रान्स, इजिप्त आणि हॉलंडला म्हटले इस्लामविरोधी देश
अल कायदाच्या म्होरक्याने सांगितले की, फ्रान्स, इजिप्त आणि हॉलंड हे इस्लामविरोधी देश आहेत. या काळात जवाहिरीने पाकिस्तान आणि बांगलादेशवरही जोरदार हल्ला चढवला. 2021 नंतर जवाहिरीचा हा व्हिडिओ जगभर समोर आला आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर अमेरिकेची गुप्तचर संस्थाही सक्रिय झाली आहे. जवाहिरीवर अमेरिकेतील 9/11 हल्ल्याचा आरोप आहे.
कोण आहे अल कायदाचा प्रमुख जवाहिरी
अमेरिकेच्या हल्ल्यात ओसामा बिन लादेनचा मृत्यू झाल्यानंतर जवाहिरीने संघटनेचे नेतृत्व हाती घेतले. इजिप्तचा रहिवासी असलेला जवाहिरी डोळ्यांचा डॉक्टर होता. 2011 मध्ये तो अल कायदाचा प्रमुख बनला होता. जगभरात अनेक ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमागे त्याचा हात असल्याचे मानले जात आहे. वयाच्या 15व्या वर्षी जवाहिरीला पहिल्यांदा अटक करण्यात आली होती. त्याने 1974 मध्ये कैरो युनिव्हर्सिटी मेडिकल स्कूलमधून पदवी प्राप्त केली. येथे त्याचे वडील प्राध्यापक होते.
हिजाब वादावर सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी
कर्नाटक उच्च न्यायालयाने हे प्रकरण फेटाळल्यानंतर हिजाबचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. 24 मार्च रोजी हे प्रकरण सुप्रीम कोर्टात घेण्यात आले होते, त्यावर सीजेआयने सुनावणी करताना सांगितले की, याला सनसनाटी बनवू नका. आम्ही याची अर्जंट सुनावणी करणार नाही.
उच्च न्यायालयात फेटाळण्यात आली याचिका
कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ऋतुराज अवस्थी, न्यायमूर्ती कृष्णा एस. दीक्षित आणि न्यायमूर्ती खाजी जयबुन्नेसा मोहियुद्दीन यांच्या तीन सदस्यीय खंडपीठाने 15 मार्च रोजी याप्रकरणी निकाल दिला होता. या निकालात उच्च न्यायालयाने दोन महत्त्वाचे मुद्दे मांडले. पहिला- हिजाब हा इस्लामचा अनिवार्य भाग नाही. दुसरा- विद्यार्थी शाळा किंवा महाविद्यालयाचा विहित गणवेश घालण्यास नकार देऊ शकत नाहीत.
1 जानेवारी 2022 रोजी सुरू झाला होता हिजाबचा वाद
कर्नाटकात हिजाबचा वाद 1 जानेवारीपासून सुरू झाला होता. येथे उडुपीमध्ये 6 मुस्लिम विद्यार्थिनींना हिजाब परिधान केल्यामुळे महाविद्यालयातील वर्गात बसण्यास त्यांना मज्जाव करण्यात आला. कॉलेज व्यवस्थापनाने नवीन गणवेश धोरण हे कारण सांगितले होते. यानंतर या मुलींनी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मुलींचा असा युक्तिवाद आहे की, त्यांना हिजाब घालण्याची परवानगी न देणे हे घटनेच्या कलम 14 आणि 25 अंतर्गत त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.