आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जगातील सर्वात धोकादायक दहशतवादी संघटना अल कायदाचा प्रमुख अल-जवाहिरीचा दम्याने मृत्यू झाला आहे. अल जवाहिरी अफगानिस्तानातील पर्वतांमध्ये लपून बसला होता. तिथे त्याला योग्य उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. अरब न्यूजने पाकिस्तान आणि अफगानिस्तानातील सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.
अल कायदाशी संबंधित सूत्रांनी अरब न्यूजला सांगितले की, 68 वर्षीय अल जवाहिरीचा मागच्या आठवड्यात मृत्यू झाला. त्याचा मृत्यू दम्यामुळे झाले. जवाहिरीला श्वास घेण्यास त्रास सुरू होता. अमेरिकन गुप्तचर संस्थांनी याची पुष्टी केली आहे. अल जवाहिरी आणि अब्दुल्ला अमेरिकेची गुप्तचर संस्था FBI च्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत सामील होते. अल जवाहिरीवर अडीच कोटी डॉलरचा इनाम होता.
ओसामाच्या मृत्यूनंतर बनला होता प्रमुख
जवाहिरीने अमेरिकेच्या हल्ल्यानंतर ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर संघटनेची जबाबदारी घेतली होती. इजिप्तचा रहिवासी जवाहिरी डोळ्यांचा डॉक्टर होता. 2011 मध्ये तो अल कायदाचा प्रमुख बनला. जगभरात झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये जबाहिरीचा हात होता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.