आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:लॉकडाऊनमध्ये अॅलन मस्क यांनी टेस्लाचा कॅलिफोनिर्यातील प्लँट पुन्हा सुरू केला, वादात राष्ट्राध्यक्ष ट्रम्पही समर्थनार्थ उतरले

कॅलिफोर्नियाएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • कारखाना सुरू करण्यास परवानगी न मिळाल्यास प्लँट शिफ्ट करण्याची धमकी

इलेक्ट्रिक कार निर्माती कंपनी टेस्लाचे सीईओ अॅलन मस्क यांनी लॉकडाऊनमध्ये कॅलिफोर्निया येथील प्लँट पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली. त्यांनी अटक होण्यास तयार असल्याचे सांगितले. मस्क यांनी टि्वट केले की, मी अन्य सर्व लोकांसोबत तिथे उपस्थित राहीन. कुणाला अटक केली जात असेल तर केवळ माझी अटक केली जावी. वाद वाढल्यानंतर अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही मस्क यांच्या समर्थनार्थ समोर आले. त्यांनी सांगितले की, कॅलिफोर्निया प्रशासनला प्लँट सुरू करण्याची परवानगी दिली पाहिजे.

मस्क यांच्या टि्वटनंतर टेस्ला आणि स्थानिक प्राधिकरणात वाद समोर आला. मस्क प्रशासनाच्या घरी थांबण्याच्या आदेशावर सतत टीका करत असून प्लँट सुरू करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी करत आहेत. मात्र, आरोग्य विभाग परवानगी देण्यास नकार देत होता. प्रशासनाचे म्हणणे होते की, कोरोनासारखी महारोगराई रोखण्यासाठी लॉकडाऊन आवश्यक आहे. त्यामुळे टेस्लाला प्लँट सुरू करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. २३ मार्चपासून लॉकडाऊनमुळे टेस्ला कंपनीचा कॅलिफोर्नियाचा प्लँट बंद होता.

एवढेच नव्हे तर, अॅलन मस्क यांनी आपली कंपनी टेस्लाला सुरू करण्याची परवानगी न मिळाल्यावरून प्रशासनाविरुद्ध खटला दाखल केला आहे. यासोबत त्यांनी प्रशासनाची बंदी चुकीची ठरवत टेस्लाचे मुख्यालय आणि प्लँटला कॅलिफोर्नियाहून बाहेर घेऊन जाण्याचाही इशारा दिला आहे. टेस्लाच्या सॅन फ्रान्सिस्को प्लँटमध्ये सुमारे २०,००० कर्मचारी आहेत. त्यातील जवळपास निम्मे फ्रेमोंटमध्ये आहेत. कोरोना संसर्गामुळे सर्वात जास्त ८१,७९५ मृत्यू अमेरिकेत झाले आहेत. कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गेविन न्यूसम यांनी या वादावरून तणाव कमी करण्याचे आवाहन केले.

टेस्लाने कर्मचाऱ्यांना ई-मेल पाठवून कामावर परत बोलावले

अॅलन मस्क यांच्या टि्वटआधी टेस्लाने प्लँटमध्ये काम करणाऱ्या कामगारांना मेलद्वारे सांगितले की, फ्रेमोंट कारखान्यात कामासाठी परत यावे. मेलमध्ये नमूद केले की, प्रॉडक्शन कर्मचाऱ्यांना सूचित केले जात आहे की, सुटी रविवारी संपली. त्यांना कधी परत यावयाचे आहे यासाठी व्यवस्थापन २४ तासांच्या आत त्यांच्याशी संपर्क करेल. जे कर्मचारी कामावर येणार नाहीत ते बिनपगारी सुटीवर राहतील. मात्र, नोकरीच्या लाभासाठी पात्र असणार नाहीत.

बातम्या आणखी आहेत...