आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल जजीराच्या महिला पत्रकाराची हत्या:चेहऱ्यावर गोळी लागल्याने गेला जीव, इस्रायली लष्करावर गोळी झाडल्याचा आरोप

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅलेस्टिनी व्याप्त वेस्ट बँक येथे बुधवारी पहाटे एका महिला पत्रकाराची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पॅलेस्टाईनच्या आरोग्य मंत्रालयाने या मृत्यूला दुजोरा दिला आहे. 'अल जजीरा'साठी काम करणाऱ्या महिला पत्रकार शिरीन अबू अकलेह यांच्या चेहऱ्यावर गोळी लागली होती. गोळी लागल्यानंतर लगेचच त्याचा मृत्यू झाला. शिरीन बुधवारी जेनिन शहरात इस्त्रायली छापेमारीची बातमी कव्हर करत होती.

शिरीन अबू अकलेह यांचा कॅमेरासोबतचा फोटो
शिरीन अबू अकलेह यांचा कॅमेरासोबतचा फोटो

मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायली सैन्याने उत्तर वेस्ट बँकमधील जेनिन शहरात छापा टाकला आहे. या दरम्यान झालेल्या गोळीबारात शिरीन यांना एक गोळी लागली, त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. इस्रायली लष्करावर हत्येचा आरोप करण्यात आला असून, लष्कराने जारी केलेल्या निवेदनानुसार, बुधवारी संशयित आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली, त्यात पॅलेस्टाईनकडून झालेल्या गोळीबारात पत्रकार शिरीन ठार झाल्या, अशी शक्यता आहे. इस्रायली लष्कर या प्रकरणाचा तपास करत आहे.

एक पॅलेस्टिनी पत्रकारही जखमी

शिरीन ही अल जजीरा या आंतरराष्ट्रीय वाहिनीची सुप्रसिद्ध पत्रकार आहे. त्यांच्या ट्विट प्रोफाईलनुसार, गेल्या 15 वर्षांपासून त्या इस्त्रायल-पॅलेस्टिन संघर्षांवर रिपोर्टींग करत होत्या. गोळीबारात यरुशलमच्या अल कुद्स या वृत्तपत्रासाठी काम करणारे एक पॅलेस्टिनी पत्रकार देखील जखमी झाला आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

शिरीनचा मृतदेह घेऊन जाताना तिचा सहकारी पत्रकार.
शिरीनचा मृतदेह घेऊन जाताना तिचा सहकारी पत्रकार.

अल जजीराने लष्कराला जबाबदार धरण्याचे सांगितले

अल जजिराने इस्त्रायली सैन्यावर हत्येचा आरोप करत निवेदन जारी करत हे कोल्ड ब्लड मर्डर असल्याचे म्हटले आहे. अल जजीराने म्हटले आहे की, लष्कर जाणूनबुजून पत्रकारांना लक्ष्य करत असून आंतरराष्ट्रीय कायद्याचे खुलेआम उल्लंघन करत आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय समुदायाला या हत्येसाठी लष्कराला जबाबदार धरण्यास सांगितले आहे.

इस्रायली लष्कराने पत्रकारांना लक्ष्य करण्यास नकार दिला आहे. तर इस्रायलचे परराष्ट्र मंत्री यायर लॅपिड यांनी शिरीनच्या मृत्यूचे दु:खद वर्णन केले आहे. लॅपिड म्हणाले की, मृत्यूची चौकशी करण्यासाठी आम्ही पॅलेस्टिनी प्राधिकरणासह संयुक्त तपासणी करण्यास देखील तयार आहोत.

बातम्या आणखी आहेत...